यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. ...
ओडिशामध्ये मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या फनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन चांगलेच ट्रोल होऊ लागलेत. ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. ...
उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी श्रीराज यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 300 याकचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. ...