300 Yaks Die Of Starvation After Heavy Snowfall In Sikkim | सिक्कीममध्ये उपासमारीने तब्बल 300 याक मृत्यूमुखी
सिक्कीममध्ये उपासमारीने तब्बल 300 याक मृत्यूमुखी

ठळक मुद्दे उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मुकुटंग व युमथांग भागात डिसेंबर 2018 पासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली असून आतापर्यंत मुकुटंग भागात याकचे 250 मृतदेह सापडले आहेत. 50 मृतदेह हे युमथांगमध्ये सापडले आहे. 

गंगटोक - उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी श्रीराज यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 300 याकचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. मुकुटंग व युमथांग भागात डिसेंबर 2018 पासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली असून आतापर्यंत मुकुटंग भागात याकचे 250 मृतदेह सापडले आहेत. तर 50 मृतदेह हे युमथांगमध्ये सापडले आहे. 

गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून हिमवृष्टीमुळे प्राण्यांना काहीच खायला मिळत नाही त्याचाच हा परिणाम असावा असे श्रीराज यादव यांनी म्हटले आहे. पशूसंवर्धन विभागाने वैद्यकीय पथक मुकुटंग येथे पाठवले असून जे याक जिवंत आहेत त्यांच्यासाठी अन्न आणि चारा पाठवण्यात आला आहे. याकची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे. मुकुटंगमधील 15 व युमथांगमधील 10 कुटुंबांच्या मालकीचे हे याक आहेत. या घटनेत फटका बसलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस व जिल्हा प्रशासन याबाबत अहवाल तयार करत आहेत. जोरदार हिमवृष्टीमुळे मदतकार्य करण्यास अडथळे येत आहेत. 

 

Web Title: 300 Yaks Die Of Starvation After Heavy Snowfall In Sikkim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.