शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 15:00 IST

वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देराजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडलीराजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडलीमध्य प्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे

वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळींच्या या सिनेमाला चांगलीच झळ बसणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजपूत समाजाने केलेल्या जोरदार विरोधामुळे आधीच भन्साळी यांनी पद्मावतीचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे.

राजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडली. हा चित्रपट राजपूत समाजाचा अपमान करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या समाजाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मध्य प्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. हा सिनेमा आधी 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होता. परंतु चित्रपटावरून झालेल्या वादामुळे प्रदर्शनाची तारीख अनिश्चितरीत्या पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट दाखवण्याआधी विविध प्रसारमाध्यमांना हा चित्रपट दाखवण्यात आला यावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी टीका केली आहे. तसेच, अर्जात त्रुटी असल्याचे दाखवत सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे.

बाजीराव मस्तानीच्या यशानंतर पद्मावती या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषमा भन्साळी यांनी केली. रणबीर सिंह व दीपिका पदुकोण या यशस्वी जोडीसह शाहिद कपूरला स्थान दिले. मात्र, अल्लाउद्दिन खिलजीसोबत कथित स्वप्नातील प्रणयदृष्ये असल्याची व अन्य आक्षेपार्ह दृष्ये असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा व राजपूत समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

संजय लीला भन्साळी यांना ठार मारण्याला बक्षीसे जाहीर करण्यात आली तर दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची धमकी देण्यात आली. मधल्या काळात एकदा संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या चित्रपटात राजपूत समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांनी फेटाळला आहे. तसेच चित्रपट बघितल्याशिवाय मत व्यक्त करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, राजकीय नेत्यांसह अनेक नेत्यांनी पद्मावती विरोधात भूमिका घेतल्याने हा चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्सालीDeepika Padukoneदीपिका पादुकोण