शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

‘पद्मावत’च्या प्रदर्शनास राजस्थानात परवानगी नाही, वसुंधरा राजेंचा निर्णय; सेन्सॉरने सुचविले तब्बल ३00 कट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:42 PM

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचे नाव ‘पद्मावत’ करून त्यास सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असली तरी तो राजस्थानमध्ये प्रदर्शित करण्यास संमती दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जाहीर केले आहे.

जयपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती या सिनेमाचे नाव ‘पद्मावत’ करून त्यास सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असली तरी तो राजस्थानमध्ये प्रदर्शित करण्यास संमती दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जाहीर केले आहे. सेन्सॉरने संमत केलेल्या चित्रपटावर अशी बंदी घालता येते का, असा नवाच मुद्दा त्यामुळे निर्माण झाला आहे.लोकभावनांचा आदर करून राजस्थानात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित करू दिला जाणार नाही, असे वसुंधरा राजे यांनी सांगितले. या चित्रपटाचे नाव बदलण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगण्याआधी राजस्थानसह अनेक राज्यांतून विरोध झाला होता.सेन्सॉर बोर्डाने त्या चित्रपटाचे केवळ नावच बदलले नसून, त्यात ३00 हून अधिक बदल करण्यात आले आहेत. दिल्ली, मेवाड, चित्तोड या शहरांची नावे मूळ चित्रपटात होती. पण तीही काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटातील कहाणी कुठे घडली, याचा बोधच प्रेक्षकांना होणार नाही. हा चित्रपट आता २५ जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. (वृत्तसंस्था)अन्य राज्यांतही बंदी येईल?राजस्थानपाठोपाठ भाजपाशासित आणखी काही राज्ये पद्मावत चित्रपटावर बंदी घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.लोकभावनांचा आदर हेच कारण त्यासाठी दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनास मंजुरी न देण्याचा निर्णय ही राज्ये देतील, असे कळते.सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरही हे घडणार असेल, तर संजय लीला भन्साळी अडचणीत येतील, असे सांगण्यात येते. दक्षिणेकडील राज्याकडून या चित्रपटाची फारशा अपेक्षा नाही.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीcinemaसिनेमा