शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

डॉ. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण; झाकीर हुसेन यांनाची गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 9:51 PM

भारत सरकारतर्फे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे

नवी दिल्ली - देशात गुरुवारी म्हणजे २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील एकूण १०६ नागरिकांना यंदाच्या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये, १९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून महाराष्ट्रातील झाकीर हुसेन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

महाराष्ट्रातील १० व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यामध्ये, एक पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. तर, गडचिरोलीपुत्र झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. खुणे यांनी आत्तापर्यंत ८०० हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे. म्हणजेच, यंदाचा पद्म पुरस्कार महाराष्ट्रासाठी मनोरंजन किंवा अभिनय क्षेत्राला देण्यात आला आहे. तर, दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे वयाचे ८८ व्या वर्षी निधन झाले. अविभाजीत बांग्लादेशच्या किशोरगंज येथे त्यांचा जन्म झाला होता. बांग्लादेशसोबतच्या युद्धावेळी त्यांनी लाईफ सेव्हींग सोल्यूशनचे निर्माण केले होते. त्यामुळे, अनेकांचा प्राण वाचले. 

सन १९७१ साली पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) वर हल्ला केला होता. या युद्धावेळी साधारण १ कोटी लोक आपला जीव वाचविण्यासाठी प. बंगालच्या सीमारेषेवरील जिल्ह्यात पळून आले होते. त्यावेळी, बोनगावस्थित रिफ्युजी कॅम्पात हैजा महामारीचा फैलाव झाला होता. तर, उपचारासाठी औषधांचा पुरवठाही नव्हता. दरम्यान, डॉ. दिलीप महालनोबिस यांनी कॅम्पमध्ये ओआरएस पाठवले. ओआरएसमुळे रिफ्युजी कॅम्पमधील रुग्णांचा मृत्यूदर ३० टक्क्यांनी कमी होऊन तो केवळ ३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.  

टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कारMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरnagpurनागपूरRepublic Dayप्रजासत्ताक दिन