मोठी बातमी! रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव; आर माधवनसह यांचाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 18:57 IST2026-01-25T18:56:44+5:302026-01-25T18:57:30+5:30

Padma Shri Awards 2026 List : पद्म पुरस्कार २०२६: रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरसह अभिनेता आर. माधवनला 'पद्मश्री'; शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचाही गौरव

Padma Shri Awards 2026: Big news! Rohit Sharma, Harmanpreet Kaur honored with Padma Shri; Education and entertainment giants also honored | मोठी बातमी! रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव; आर माधवनसह यांचाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

मोठी बातमी! रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव; आर माधवनसह यांचाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कप विजेती 'कॅप्टन जोडी' रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह लोकप्रिय अभिनेता आर. माधवन यांना २०२६ चा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि महिला संघाची धडाकेबाज कर्णधार हरमनप्रीत कौर यांना क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान मिळाला आहे. तसेच, पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार आणि टेनिस दिग्गज विजय अमृतराज (पद्मभूषण) यांचाही गौरव करण्यात आला आहे.

मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील मानकरी
चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर. माधवन यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

प्रशासकीय आणि शैक्षणिक योगदान
यूजीसीचे (UGC) माजी अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ शशी शेखर वेम्पती यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि प्रशासकीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांच्या घोषणेमुळे क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्वच स्तरातून या मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title : रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर पद्मश्री से सम्मानित; दिग्गजों का गौरव

Web Summary : क्रिकेटर रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, अभिनेता आर. माधवन और शिक्षाविदों को पद्मश्री पुरस्कार। विजय अमृतराज को पद्म भूषण। खेल, कला, प्रशासन और शिक्षा में योगदान के लिए सम्मान, सभी क्षेत्रों में जश्न।

Web Title : Rohit Sharma, Harmanpreet Kaur Honored with Padma Shri Awards

Web Summary : Cricketers Rohit Sharma, Harmanpreet Kaur, actor R. Madhavan, and educationists are awarded the Padma Shri. Vijay Amritraj gets Padma Bhushan. The awards recognize contributions to sports, arts, administration, and education; celebrations ensue across sectors.