'पबजी'चा नाद लय बेक्कार, गेम खेळण्यासाठी त्यानं प्रेग्नंट बायकोला सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 18:44 IST2019-02-11T18:43:23+5:302019-02-11T18:44:03+5:30
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे.

'पबजी'चा नाद लय बेक्कार, गेम खेळण्यासाठी त्यानं प्रेग्नंट बायकोला सोडलं
मलेशिया - मलेशियात एक व्यक्ती गेल्या महिन्यापासून बेपत्ता झाल्याची बातमी होती. मात्र, आता या बेपत्ता व्यक्तीने त्याच्या कुटुंबाला सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, केवळ पबजी गेमसाठी या व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीसह कुटुंबाला सोडून दिले आहे. या वक्तीला पबजी गेम्सचे व्यसनच जडले होते. त्यामुळे गेम खेळताना कुणाचाही अडथळा नको, यासाठी त्याने चक्क आपल्या पत्नीला सोडून दिले.
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. वर्ल्ड बझ या वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. याबाबत पीडित पत्नीने फेसबुकवरुन आपल्या पबजीवेड्या नवऱ्याचं दु:ख मांडलं आहे. 'मलाय' भाषेत ही पोस्ट लिहिण्यात आली आहे. आपण पतीला गेम खेळताना रागावल्यामुळे त्यांनी घर सोडल्याचं पीडित पत्नीनं म्हटलंय. विशेष म्हणजे पबजी खेळण्याच्या नादात या व्यक्तीने आपले कामही सोडून दिले होते, आणि इतरही बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचं पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पतीच्या दिवसरात्र पबजी खेळण्यामुळे कुटुंबाच्या राहणीमान आणि दैनंदीन कामकाजातही अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे हा वाद झाला असून आता पतीने घर सोडून एक महिना उलटल्याचे पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पबजी खेळायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचा स्वभाव अतिशय समजूतदार होता, पण आता ते पबजीशिवाय इतर काहीही पाहात नव्हते. मात्र, आता त्यांनी घरं आलं पाहिजे, अशी आमची सर्वांची इच्छा असून आम्हाला काळजी वाटत आहे, असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.