पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:34 IST2025-01-19T16:33:16+5:302025-01-19T16:34:22+5:30

P. Chidambaram News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाच माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे. 

P. Chidambaram supports 90-hour working hours, says about Subrahmanyam's statement... | पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

पी. चिदंबरम यांनी केलं ९० तास काम करण्याचं समर्थन, सुब्रह्मण्यम यांच्या विधानाबाबत म्हणाले...

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम केलं पाहिजे, असा दिलेला सल्ला टीकेचा विषय ठरलेला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता, त्यावरून उलट सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाच माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सल्ल्याचं समर्थन केलं आहे. 

सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पी. चिदंबरम म्हणाले की, सुब्रह्मण्यम यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला असला तरी भारत हा एक विकसनशिल देश आहे. तसेच त्यांचं विधान हे उत्पादन वाढवण्यासाठीचा उद्देश दर्शवते. मला वाटतं की, जीवनात मोठं यश मिळवल्यानंतर आणि उच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते भारतीयांसाठी कामाचे तास वाढवण्याबाबत सल्ला देण्याच्या योग्यतेचे आहेत. 

चिदंबरम पुढे म्हणाले की, नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांनी केलेल्या विधानाचा उद्देश हा महत्त्वाकांक्षी तरुणांना समृद्ध देशाच्या निर्मितीसाठी साधनाच्या रूपात कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित करणे हा होता. याबाबत उदाहरण देताना चिदंबरम यांनी सांगितले की,  शेतकरी आणि सेल्फ एम्पॉइड व्यक्ती कामाच्या ८-८-८ तासांच्या मर्यादेचं पालन करत नाही. तसेच डॉक्टक वकील आणि शास्त्रभ हेसुद्धा ८ तासांहून अधिक काळ काम करतात, असेही चिदंबरम म्हणाले.

याबाबत आपला अनुभव सांगताना चिदंबरम म्हणाले की, मला अधिक काळ काम करायला आवडतं. त्यामध्ये कायद्याचा अभ्यास, संसदीय कार्य, लेखन आणि सार्वजनिक जीवनातील सहभाग यांचा समावेश आहे.

दरम्यान, गतवर्षी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी कमी उत्पादन क्षमतेचं कारण देत ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हल्लीच लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन यांनी नारायण मूर्ती यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जात आठवड्याला ९० तास काम करण्याच सल्ला कर्मचाऱ्यांना दिला होता. 

Web Title: P. Chidambaram supports 90-hour working hours, says about Subrahmanyam's statement...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.