OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:09 IST2025-07-25T10:08:22+5:302025-07-25T10:09:13+5:30
गढ़ चौपले भागात राहणारी एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत सिंभावली पोलीस ठाणे क्षेत्रात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये गेली होती. अनेकदा ती प्रियकरासोबत अशीच मौजमजा करण्यासाठी जात होती.

OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली...
याच महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत अनैतिकतेचा अड्डा बनलेले ओयो कांड पोहोचले आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या हापुड जिह्ल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विवाहित प्रेयसीला तिचा प्रियकर नेहमी ओयोमध्ये घेऊन यायचा. पतीला याची कुणकुण लागताच त्याने थेट ओयोवरच छापा टाकला आणि दोघांनाही नग्नावस्थेत पकडले. महिलेचे नातेवाईक व्हिडीओ काढत असल्याचे पाहून प्रियकराने विवस्त्र अवस्थेतच हायवेवरून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे.
गढ़ चौपले भागात राहणारी एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत सिंभावली पोलीस ठाणे क्षेत्रात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये गेली होती. अनेकदा ती प्रियकरासोबत अशीच मौजमजा करण्यासाठी जात होती. पतीला संशय आला होता म्हणून त्याने तिच्यावर पाळत ठेवली आणि ती ओयोमध्ये जाताच थोड्यावेळाने पती देखील तिथे पोहोचला.
ओयो हॉटेल वाल्यांना धमकावून त्याने पत्नी ज्या रुममध्ये गेली त्या रुमचा दरवाजा उघडण्यास सांगितला. जेव्हा तो आतमध्ये गेला तेव्हा पत्नी आणि तिचा प्रियकर नग्नावस्थेत होते. पतीला आलेले पाहून पत्नी बाथरुममध्ये पळाली. तर प्रियकराने मार पडणार या भीतीने नग्नावस्थेतच ओयो हॉटेलमधून पलायन केले. हायवेपर्यंत हा प्रियकर नग्नावस्थेतच पळत होता. तिथून तो पसार झाला परत कपडे घेण्यासाठी हॉटेलवर परतलाच नाही.
या दोन्ही ठिकाणांचे व्हिडीओ लोकांना काढले आणि ते व्हायरल झाले आहेत. महिलेचा पती आणि तिच्या सासरच्यांसोबत वाद सुरु आहे. तिने या लोकांविरोधात पोलिसांत एफआयआर देखील दाखल केलेला आहे. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो आणि अत्याचार करतो असा तिचा आरोप होता. जो गुरुवारी खरा ठरला आहे. पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हॉटेल रुममध्ये रंगेहाथ पकडले आहे. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत असून पतीला आता त्याच्यावरील आरोप आणि घटस्फोटासाठी सबळ पुरावा मिळाला आहे.