शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Oxygens: काय सांगता! श्वास घेण्यास त्रास होताच ऑक्सिजनसाठी रुग्ण थेट पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 3:43 PM

या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली बसून आराम मिळाला की नाही हे माहिती नाही परंतु रुग्णांना पिंपळाच्या झाडाखाली झोपलेले पाहून इतरांनीही त्याठिकाणी गर्दी केली.

ठळक मुद्देकाहींनी या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली पडून राहा, भरपूर ऑक्सिजन मिळेल असं सांगितलं. हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानं त्यांना दाखल करण्यासाठी नकार देत घरी पाठवलंले. या प्रकाराची माहिती मिळताच तिलहरचे आमदार रोशनलाल हेदेखील झाडाखाली झोपलेल्या रुग्णांना बघण्यासाठी तिथे पोहचले.

शाहजहांपूर – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेड्स आणि ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शाहजहांपूरच्या तिलहर याठिकाणी अजब गजब प्रकार समोर आला आहे. येथे ४-५ लोकांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली तेव्हा ते ऑक्सिजन सिलेंडर शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेही ऑक्सिजन मिळाला नाही.

त्यानंतर या लोकांना कोणीतरी सांगितलं की, पिंपळाचं झाड २४ तास ऑक्सिजन देतं. त्यानंतर हे ५ रुग्ण तिलहर परिसरातील रोडवर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले. या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली बसून आराम मिळाला की नाही हे माहिती नाही परंतु रुग्णांना पिंपळाच्या झाडाखाली झोपलेले पाहून इतरांनीही त्याठिकाणी गर्दी केली. तिलहरच्या मोहल्ला बहादुरगंज येथील अनेक कुटुंब गेल्या ३ दिवसांपासून फतेहगंजच्या रस्त्याच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली दिवसरात्र विश्रांती घेत आहेत.

या सर्वांची अवस्था खूप खराब होती. या सगळ्यांची अँटिजेन चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु संक्रमणाचे लक्षण या लोकांमध्ये दिसून येत आहे. हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानं त्यांना दाखल करण्यासाठी नकार देत घरी पाठवलं. घरात अवस्था बिकट झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरची शोधाशोध सुरू झाली. पण कुठेही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही.

याचवेळी काहींनी या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली पडून राहा, भरपूर ऑक्सिजन मिळेल असं सांगितलं. त्यानंतर ३ दिवसांपासून ५ लोक याठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली झोपले होते. त्यानंतर या लोकांना विचारला असता त्यांनी घरात श्वास घेण्यास त्रास होतोय पण पिंपळाच्या झाडाखाली येऊन आराम मिळतोय असं सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच तिलहरचे आमदार रोशनलाल हेदेखील झाडाखाली झोपलेल्या रुग्णांना बघण्यासाठी तिथे पोहचले. त्यानंतर आमदार रोशनलाल यांनी या सर्वांना डॉक्टरांची सुविधा मिळण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल