Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 02:35 PM2021-05-07T14:35:34+5:302021-05-07T14:36:57+5:30

Oxygen Shortage: सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेकविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू आहे.

oxygen shortage SC said that 700 MT has to be supplied to Delhi on daily basis | Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

Next
ठळक मुद्देकठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नकासुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलंकर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश जैसे थे

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. आताच्या परिस्थितीत कोरोना होऊच नये, यासाठी प्रार्थना केली जातेय. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेकविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दिल्लीला काही झाले तरी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालाच पाहिजे. कठोर निर्णय घेण्यासाठी आम्हाला भाग पाडू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारवर संताप व्यक्त केला. (oxygen shortage SC said that 700 MT has to be supplied to Delhi on daily basis)

दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध नाही. यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी केली होती. यावर केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली. यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना केंद्र सरकारला फटकारण्यात आले आहे. 

कठोर निर्णय घेण्यास आम्हाला भाग पाडू नका

दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनता पुरवठा झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीच्या रुग्णयांना दिला जावा. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला जावा, असे न्या. चंद्रचूड यांनी केंद्राला बजावले आहे. अन्यथा आम्हाला सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी

कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश जैसे थे

कर्नाटक राज्याला प्रतिदिन १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. याविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आताच्या घडीला कर्नाटकमध्ये ९६५ मेट्रीक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे.

पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
 

Web Title: oxygen shortage SC said that 700 MT has to be supplied to Delhi on daily basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.