शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

तेलंगणात ओवेसी किंगमेकर?, टीआरएसला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:46 AM

तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

- धनाजी कांबळेहैदराबाद : तेलंगणात एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून, सत्ता स्थापन करण्यात एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने टीडीपी, डीजेएस आणि सीपीआयसोबत आघाडी केली असली, तरी टीआरएसला ७४ जागांवर विजय मिळेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने केलेल्या विकासामुळेच त्यांना पुन्हा सत्तेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन ओवेसी प्रत्येक सभेत करत आहेत.राज्यात मुख्य लढत काँग्रेस आघाडी व टीआरएस अशीच होईल. तरीही यात सरकार स्थापन करताना एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हैदराबादमध्ये मोठी ताकद असलेल्या एमआयएमने गेल्यावेळी ७ जागांवर विजय मिळवला होता. ज्या मतदारसंघांत आमचे उमेदवार रिंगणात आहेत. तिथे आम्ही प्रचार करीतच आहोत. मात्र, ज्या भागात आमचे उमेदवार नाहीत. तिथे काँग्रेस आघाडी आणि भाजपच्या विरोधात टीआरएसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असे ओवेसी सांगत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस आणि टीडीपीने विषमतेचे राजकारण केले असून, विकासाच्या नावावर जनतेला केवळ भुलथापा दिल्या आहेत. जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्या तुलनेत केसीआर यांनी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या असून, त्यामुळे मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे, असे ओवेसी यांनी बोलून दाखवले.आम्ही नेहमी विकासाच्या बाजूचे राजकारण केले आहे. तहीही काँग्रेस नेहमीच आम्हाला आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आली आहे. त्यांचा विरोध केला की, आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आम्हाला १९९८ तो २०१२ पर्यंत काँग्रेसची एफ टीम, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता आम्हाला बी टीम म्हटले जात आहे. आम्ही केलेल्या विकासामुळेच त्यांना आमची दखल घ्यावी लागत आहे, हाच त्याचा अर्थ आहे. येत्या २-३ वर्षांत आम्हीच ए टीम असू, असा दावा ओवेसी यांनी केला.ठग्ज आॅफ तेलंगणाकेसीआर यांनी स्वत:च्या कुटुंबाचाच फायदा केला असून, सत्ता घरातच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेचा विकास न करता केवळ ठकविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच केसीआर यांनी स्वत:चा मुलगा, मुलगी, पुतण्या, आणि भाचा यांना सत्तेत वाटा देऊन जनतेला ठकविले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील फसविले आहे, असा आरोप काँग्रेस आघाडी आणि भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, त्याबाबत येथील मतदार उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आमचे म्हणणे काय आहे, ते निवडणूक निकालांतूनच कळेल, असे ते सांगतात.>टीआरएसला ७४ जागा मिळतीलमी काही भविष्यवेत्ता नाही किंवा माझा त्यावर विश्वास नाही. मात्र, जे वातावरण सध्या सर्वत्र दिसत आहे, त्यावरून टीआरएसला ७४ जागा मिळतील, असे ओवेसी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही ज्या ८ जागा लढवत आहोत, तिथे आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी