शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सशस्त्र पोलीस दलात लाखाच्या वर जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 6:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल