संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:42 IST2025-08-28T14:36:44+5:302025-08-28T14:42:55+5:30
या संदर्भात सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत पण, यामुळे गुन्हेगारीही वाढली आहे. कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल खराब झाला म्हणून दुरुस्तीला एका केअर शॉपमध्ये दिला पण काही तासानंतर त्या व्यक्तीचा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्याची घटना समोर आली.
रेडिट वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत एक घटना शेअर केली. ही पोस्ट आपल्याला विचार करण्यास भाग पाडू शकते. 'कोलकातामधील फोन दुरुस्ती करणाऱ्याने खाजगी व्हिडीओ लीक केले. या धक्क्यातून कसे बाहेर पडायचे ते मला समजत नाही' असं त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'मी पूर्णपणे तुटलो आहे. तेव्हापासून माझे आईवडीलही माझ्याशी बोलत नाहीत. मी माझे सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत, माझा फोन नंबर बदलला आहे आणि स्वतःला सर्वांपासून पूर्णपणे दूर केले आहे. आता मी माझ्या खोलीतून बाहेर पडत नाही. मी लोकांना भेटणे टाळत आहे आणि माझा फोन वापरणे देखील बंद केले आहे', असंही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. रेडिट युजरने आणखी एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, यामध्ये अनेक युजर्स त्याला घाणेरडे मेसेज पाठवत आहेत.
माझी बदनामी झाली
'आता माझी प्रतिमा मलिन झाली आहे. त्याने इतर वापरकर्त्यांकडूनही सल्ला मागितला आहे. या संदर्भात सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार महिला पोलिस ठाण्यात पाठवल्याची माहिती दिली असल्याचे त्याने म्हटले आहे.