१३ विधानसभा जागांपैकी भाजपला ५, काँग्रेसला ४ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:11 AM2021-05-04T02:11:38+5:302021-05-04T02:12:13+5:30

पोटनिवडणूक ; वायएसआर काँग्रेस, भाजप, काँग्रेस, आययूएमएलला प्रत्येकी एक जागा

Out of 13 assembly seats, BJP got 5 seats and Congress got 4 seats | १३ विधानसभा जागांपैकी भाजपला ५, काँग्रेसला ४ जागा

१३ विधानसभा जागांपैकी भाजपला ५, काँग्रेसला ४ जागा

Next

नवी दिल्ली : देशात लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेस, भाजप, काँग्रेस, आययूएमएल या पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे, तर देशभरात १३ विधानसभांच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपने ५, काँग्रेसने ४, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी), तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेपीएम), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) या राजकीय पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांपैकी आंध्र प्रदेशमधील तिरुपती मतदारसंघात वायएसआर काँग्रेसचे उमेदवार मद्दिला गुरुमूर्ती यांनी तेलगू देसम पार्टीचे उमेदवार पानाबाका लक्ष्मी यांचा २ लाख ७१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. कर्नाटकमध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे उमेदवार सतीश जर्कीहोळी यांच्यावर ५२४० मतांनी विजय मिळविला. केरळमध्ये आययूएमएल पक्षाचे उमेदवार अब्दुससमद समदानी यांनी १,१४,६९२ मतांची आघाडी घेऊन माकपचे उमेदवार व्ही. पी. सानू यांचा पराजय केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व्ही. विजयकुमार यांनी भाजपचे उमेदवार राधाकृष्णन पी. यांच्यावर १ लाख ३७ हजार मतांनी विजय मिळविला.

लोकमत न्यूज नेटवर्क

राजस्थानमध्ये काँग्रेस २ विधानसभा जागांवर विजयी
राजस्थानमध्ये सुजनग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मनोजकुमार मेघवाल यांनी भाजपचे उमेदवार खेमाराम यांचा ३५,६११ मतांनी, राजसमंद मतदारसंघात भाजपच्या दीप्ती माहेश्वरी यांनी काँग्रेसच्या तनसुख बोहरा यांचा ५३१० मतांनी, तर सहादा येथे काँग्रेसच्या गायत्रीदेवी यांनी भाजप उमेदवार रतनलाल जाट यांचा ४२,२०० मतांनी पराजय केला.

Web Title: Out of 13 assembly seats, BJP got 5 seats and Congress got 4 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.