शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 22:15 IST

मोदींकडून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींचा विशेष उल्लेख

नवी दिल्ली: शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारण्याच्या पलीकडचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देश विकसित आणि सशक्त व्हावा, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा असल्याचंदेखील पंतप्रधान मोदी म्हणाले. आज मुंबईत शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा झाली. यानंतर मोदींनी ट्विट करुन यावर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. शिवसेना-भाजपाने निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एनडीएचं सामर्थ्य वाढलं आहे. या युतीला महाराष्ट्र साथ देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. याचसोबत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचादेखील उल्लेख केला. 'बाळासाहेब आणि अटलजी यांच्याकडून प्रेरणा घेत शिवसेना-भाजपा युती महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल. महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा विकासचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे लोकप्रतिनिधी निवडून देईल,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. 

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीबद्दल चर्चा सुरू होती. अखेर याबद्दलची घोषणा आज करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. युतीच्या अंतिम चर्चेसाठी मित्रपक्षाला पटक देंगे म्हणणारे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मातोश्रीवर आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस