शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत ट्रस्टशिवाय इतर ट्रस्टना रामलल्लाच्या नावे दान किंवा वर्गणी गोळा करण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 08:49 IST

रामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही.

ठळक मुद्देरामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र बोर्डाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही मार्गदर्शक सूचना सर्वच राज्यांना जारी केली आहे.  नवी दिल्लीत 19 फेब्रुवारीला झालेल्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पहिल्या बैठकीनंतर अध्यक्ष बनलेल्या महंत नृत्यगोपाल दास आणि महासचिव चंपत राय यांनी स्वतः इतर ट्रस्टला दान-वर्गणी स्वीकारण्यास आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्लीः रामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र बोर्डाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही मार्गदर्शक सूचना सर्वच राज्यांना जारी केली आहे. राममंदिर निर्माणासाठी 1984मध्ये पहिल्यांदा श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती गोरक्षपीठाश्वर महंत अवैद्यनाथजी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली होती. वर्षभरानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी शिवरामाचार्यजी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर 1985मध्ये श्रीरामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली. स्वामी शिवरामाचार्यजी यांचं 1989ला देहवसान झाल्यानंतर महंत परमहंस रामचंद्र दास यांच्याकडे संस्थेचं अध्यक्षपद आले. या ट्रस्टनं आतापर्यंत जवळपास 20 कोटी रोख, भू-इमारती, मंदिर बांधकामाच्या दगडांसह बांधकाम साहित्य जमा केल्याची माहिती समोर आली आहे. महंत नृत्यगोपाल दास हे सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर तात्काळ तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या प्रयत्नांनी ज्योतिष पीठाधीश्वर व द्वारिकाशारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली 1993मध्ये अयोध्या श्रीराम जन्मभूमी रामालय न्यास स्थापन झाला. अयोध्या ऍक्ट आणून याच ट्रस्टला राममंदिराच्या पुनर्निर्माणांचं काय सोपवण्याची तत्कालीन सरकारनं तयारी चालवली होती. तिसरी ट्रस्ट श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यास आहे. त्या ट्रस्टलाही रामलल्लांचं मंदिर तयार करण्यासाठी कोट्यवधींची वर्गणी आणि दान मिळालेलं आहे.  नवी ट्रस्ट स्थापन झाल्यानंतरही रामालयानं सोन्याचा संग्रह या अभियानांतर्गत देशातील सात हजार गावांमधून एक हजार किलो सोनं जमवून भव्य मंदिर तयार करण्याचं काम 7 फेब्रुवारी 2020लाच सुरू केलं आहे. या अभियानाविरोधात डीएम अनुजकुमार झा यांनी सरकारला एक अहवाल पाठवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत 19 फेब्रुवारीला झालेल्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पहिल्या बैठकीनंतर अध्यक्ष बनलेल्या महंत नृत्यगोपाल दास आणि महासचिव चंपत राय यांनी स्वतः इतर ट्रस्टला दान-वर्गणी स्वीकारण्यास आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर केंद्रानं कडक पावलं उचलत सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर