शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पीएनबी घोटाळ्याची इतर 5 बॅंकांना झळ, बसणार 17 हजार 500 कोटींचा फटका !  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 12:25 PM

नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या 36व्या मजल्यावरील एका आलिशान सूटमध्ये आहे. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्ट असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली/मुंबई/न्यूयॉर्क : पीएनबी घोटाळ्यामुळे इतर किमान 5 बँकांना 17,500 कोटी रुपयांचा फटका बसू शकेल, असा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे. पीएनबीवर विसंबून या इतर बँकांनीही नीरव मोदी व मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना कर्जे व बँक गॅरेन्टी दिल्या आहेत. प्राप्तिकर विभागानुसार हा प्राथमिक अंदाज असून, अन्य बँकांना प्रत्यक्ष लागणारी झळ याहूनही कदाचित जास्त असू शकेल. मोदी व त्याच्या समूहाच्या 29 मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली आहे, तर त्यांची 105 बँक खाती गोठविण्यात आली आहेत.मोदीच्या घरांत नीरव शांतता -मुंबईतील पेडर रोडवरील ग्रॉसव्हेनर हाउस इमारतीच्या दुस-या मजल्यावर नीरव मोदीच्या कुटुंबीयांच्या नावे घरे आहेत. नीरवचे वडील दीपक मोदी आणि भाऊ नीशाल डी मोदी अशा दोन पाट्या घरांवर दिसतात, पण या घरांत आता नीरव शांतता आहे. तेथे नुसतेच नोकर राहतात. तसेही मोदी या घरांत अनेक वर्षांत जेमतेम 3-4 वेळाच आल्याचे शेजारी सांगतात. मुंबईचे माजी शेरीफ किरण शांताराम हे त्यांचे शेजारी आहेत. शांताराम यांच्या पत्नी ज्योती यांनी सांगितले की, ‘हे लोक मैत्रीपूर्ण नव्हते.’ येथून काही मैलावर गोकुळ अपार्टमेंटमध्ये मेहुल चोकसीचे पेंटहाउस आहे. वरळीला समुद्र महलमध्ये त्याचे निवासस्थान आहे.नीरव मोदी न्यूयॉर्कच्या हॉटेलात?परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या 36व्या मजल्यावरील एका आलिशान सूटमध्ये आहे. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्ट असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.ऑडिटमध्ये काहीच कसे नाही?पीएनबीचे अनेक माजी अधिकारीही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ज्यांनी नियम मोडले, तसेच पर्यवेक्षीय जबाबदाºया नीट पार पाडल्या नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. यातील अनेक अधिकारी आता दुसºया बँकांत आहेत. एक उपव्यवस्थापक व २ कर्मचारी अशा तिघांनी २00 पेक्षा जास्त एलओयू जारी केले, तरी ते आॅडिटमध्ये कसे काय सापडले नाही, याचाही तपास होणार आहे.नीरव मोदी याने घडविलेल्या 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दोन वरिष्ठ अधिका-यांसह तिघांना सीबीआयने शनिवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची सीबाआय कोठडी सुनावली आहे. कंपनीचे स्वाक्षरी हक्क असलेल्या एका अधिका-यासही अटक केली आली आहे.ईडीने आजही नीरव मोदीच्या 21 ठिकाणांवर छापे मारले आणि हिरे, सोने, मौल्यवान रत्न, दागिने अशी 25 कोटी रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. आतापर्यंत मोदी व चोकसी यांच्यावर घालण्यात आलेल्या धाडींतून सुमारे 5,700 कोटी रुपये किमतीचा ऐवज हाती लागला आहे.पीएनबीचा उपव्यवस्थापक (निवृत्त) गोकुळनाथ शेट्टी व मनोज खरात यांच्यासह हेमंत भट याला सीबीआयने अटक केली. हेमंत भट हा नीरव मोदीच्या कंपनीचा कर्मचारी होता. या प्रकरणात 280 कोटींची फसवणूक झाल्याचे बँकेने तक्रारीत नमूद केले होते. तथापि, सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत 150लेटर्स ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) समोर फसवणुकीचा आकडा 6,498 कोटींवर गेला आहे. काल आणखी 4,886 कोटींच्या 150  एलओयू प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. दुसरी तक्रार मेहुल चोकसी याच्या गीतांजली जेम्स, नक्षत्र ब्रँडस् आणि गिली कंपन्यांविरुद्ध आहे. हे सर्व एलओयू 2017-18  या वर्षातील आहेत वा नूतनीकृत झालेले आहेत. बँकेचे आणखी 6 अधिकारीही चौकशीच्या फेºयात सापडले आहेत.पीएनबीने आणखी 8अधिका-यांना निलंबित केले असून, निलंबित अधिकाºयांची संख्या आता 18 झाली आहे. बँकेने 10अधिका-यांना गेल्या महिन्यात निलंबित केले होते. निलंबितांमध्ये मुंबईतील 2 सरव्यवस्थापकांचा समावेश आहे. गोकुळनाथ शेट्टी याची अनेक वर्षे ब्रॅडी हाउस शाखेतून बदली न केल्याबद्दल मनुष्यबळ विभागाच्या सरव्यवस्थापकाची आता बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी