शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकीत आक्रमक व्हा, पवारांचा राहुल गांधींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 1:28 PM

राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत खलबतं

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा नेत्यांनी 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. एकीकडे भाजपा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकत्र येताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीसाठी राहुल गांधींनी पुढाकार घेतला होता. राहुल यांच्या भेटीसाठी शरद पवार फक्त एका दिवसासाठी दिल्लीला गेले होते. राहुल यांनी पवारांच्या जनपथवरील सरकारी निवासस्थानावर त्यांची भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. आगामी लोकसभा निववडणुकीतील विरोधकांच्या रणनितीबद्दल या भेटीत चर्चा झाली. यूपीए सरकारच्या काळात कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी राहुल गांधींना काही विशेष सूचना केल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक होऊन प्रचार करण्याचा सल्ला यावेळी पवारांकडून राहुल यांना देण्यात आला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, असं शरद पवारांनी राहुल यांना सांगितलं. 'या तीन राज्यांमध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेसला यश आल्यास त्याचा मोठा फायदा विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकीत होईल. याशिवाय या विजयामुळे काँग्रेसचंही राजकीय वजन वाढेल,' असं पवारांनी राहुल गांधी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक आणि गुजरात प्रमाणेच तिन्ही राज्यांमध्ये आक्रमक होऊन प्रचार करा, असं पवार म्हणाले. या तिन्ही राज्यातील निवडणूक निकालाचा परिणाम 2019 मधील लोकसभा निवडणुकीला पाहायला मिळेल, असं पवारांनी राहुल यांना सांगितलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLoksabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस