शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट

By admin | Updated: November 14, 2016 19:10 IST

नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासावरून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 -  नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासावरून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला संसदेत घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, आरजेडी, जेडीयू आणि अन्य पक्ष सहभागी झाले. आता पुढील  रणनीती ठरवण्यासाठी या पक्षांनी मंगवळवारी अजून एका बैठकीचे आयोजन केले आहे. 
बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच दिवशी विरोधी पक्षांच्या 100 खासदारांना घेऊन नोटबंदीविरोधात संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच विरोधी पक्ष बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची मागणी करू शकतात. 
दरम्यान, सोमवारी दिल्लीत एकाच वेळी काँग्रेस, आप आणि बसपा या तीन पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच भडिमार केला. यावेळी नोटबंदीबाबत भाजपाला आधीपासून माहिती होती, अशी शंका काँग्रेसने पुन्हा उपस्थित केली. मायावती  आणि अरविंद केजरीवाल यांनीही पत्रकार परिषदेतून मोदींवर सडकून टीका केली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 50 दिवस त्रास सहन करण्याच्या मोदींनी केलेल्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
दुसरीकडे तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. नोटबंदीच्या निर्णयाविरोधात सगळ्या भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ममता बॅनर्जींनी सीताराम येचुरी यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, डाव्या पक्षांनीही नरेंद्र मोदींची काळ्या पैशाविरोधातील कारवाई हा केवळ देखावा असल्याची टीका केली आहे.