शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 21:42 IST

कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

ठळक मुद्देदेशातील कोरोना व्हायरसचे संकट आणि अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पार पडली विरोधी पक्षांची बैठकसोनिया गांधी म्हणाल्या, कोरोनाचा 21 दिवसांत खत्मा करण्याचा पंतप्रधानांचा दावा सफशेल फसलाकोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला -सोनिया गांधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसचे संकट आणि अम्फान चक्रीवादळाचा तडाखा, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमाने झालेल्या या बैठकीत, अम्फान चक्रीवादळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. यावेळी बैठकीची सुरुवात करतानाच सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. 

अर्थव्यवस्थेला मोठा झटका -सोनिया गांधी म्हणाल्या, अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनीही तत्काळ मोठ्या प्रमाणावर मदत निधी देण्यात यावा, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी 12 मेरोजी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी पाच दिवस त्याची माहिती दिली. ही देशासोबत केलेली क्रूर थट्टा आहे.

Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द

सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते -कोरोनाचा 21 दिवसांत खत्मा करण्याचा पंतप्रधानांचा दावा सफशेल फसला. सरकारकडे लॉकडाउनसंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्लॅन व्हता. सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते. सातत्याने लॉकडाउन केल्याचा काहीही फायदा झाला नाही, परिणाम खराबच आले. कोरोना टेस्ट आणि पीपीई किटच्या मोर्चावरही हे सरकार फेल ठरले. अर्थव्यवस्था कोलमडली. लॉकडाउनच्या नावावर क्रूर थट्टा झाली. पीएमओकडे सर्वप्रकारची पावर आहे. त्याचा वापर कर्मचारी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जावा, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo

कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

सपा, बसपा, आप बैठकीपासून दूरच -या बैठकीला अनेक विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एनसीपी अध्यक्ष शरद पवार, सीताराम येचुरी, तेजस्वी यादव, डीएमके के एमके स्टालिन आणि शिवसेनेचे संजय राउत यांनी आपापल्या पक्षांचे प्रतिनिधित्व केले. मात्र, या पैठकीपासून सपा, बसपा आणि आम आदमी पार्टीने मात्र, दूर राहणेच पसंत केले. 

योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCyclone Amphanअम्फान चक्रीवादळcycloneचक्रीवादळSonia Gandhiसोनिया गांधीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार