निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:06 IST2025-07-26T06:06:42+5:302025-07-26T06:06:56+5:30
संसद अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळाचा

निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळातच सरला. बिहारमधील मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकनासह इतर मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याने दोन्ही सभागृहांत गोंधळ राहिला. दरम्यान, बिहार मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंबंधीचे पोस्टर्स व बॅनर्स फाडून कचऱ्यात टाकली. शुक्रवारी याच मुद्द्यांवर लोकसभा व राज्यसभेत गोंधळ झाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
अभिनेते गेले राज्यसभेवर
अभिनेते कमल हसन यांना राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. द्रमुकचे राजाथी, एस. आर. शिवलिंगम आणि पी. विल्सन यांनाही शपथ दिली.
कामकाजात काय?
> मनरेगा मजुरीत सरासरी ५ टक्के वाढ
> न्या. यशवंत वर्मा महाभियोग प्रस्ताव लोकसभेत.
> ५ वर्षांत हत्तींच्या हल्ल्यांत २८००हून अधिक लोकांचा मृत्यू.