शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:55 IST

Ajit Doval brief PM Modi: गुरुवारी सकाळी एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली.

Operation Sindoor ( Marathi News )  : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. काल भारताने पाकिस्तानमधील ९  दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यामुळे दिल्लीत हालचालिंना वेग आला आहे, या बैठकीआधी पीएम मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली.

'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हेही बैठकीला पोहोचले. बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. बैठक सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मोदी सरकार दहशतवादावर मोठा हल्ला करणार असल्याचे मानले जात आहे.

दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे आवश्यक

मोदी सरकार आणि लष्कर पुन्हा हवाई हल्ले करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या हवाई हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्य इतर ठिकाणीही हल्ला करू शकते. काश्मीरमधून दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी, पाकिस्तानच्या सीमेभोवती असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे आवश्यक आहे.

सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, एस जयशंकर, जेपी नड्डा आणि निर्मला सीतारमण यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसकडून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसकडून सुदीप बंदोपाध्याय आणि द्रमुककडून टीआर बालू हे प्रमुख विरोधी नेते बैठकीला उपस्थित होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. इतर विरोधी नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, शिवसेनेचे ( ठाकरे गटाचे) संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, बीजेडीचे सस्मित पात्रा आणि सीपीआय(एम) चे जॉन ब्रिटास यांचा समावेश होता. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवालPakistanपाकिस्तानwarयुद्धsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान