'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:42 IST2025-11-17T16:38:27+5:302025-11-17T16:42:15+5:30
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर असल्याचे सांगितले.

'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोटानंतर सुरक्ष यंत्रणा अलर्टवर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू असून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता बॉम्बस्फोटानंतर, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तान आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त एक ट्रेलर होता आणि देश कोणत्याही मोठ्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार असल्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी चाणक्य संरक्षण संवादात लष्करप्रमुखांनी हा इशारा दिला. भारत दहशतवाद्यांशी आणि त्यांच्या समर्थकांशी त्याच पद्धतीने व्यवहार करेल. जेव्हा कोणताही देश राज्य-पुरस्कृत दहशतवादाला प्रोत्साहन देतो, तेव्हा तो भारताच्या प्रगतीत अडथळा आणतो. अशा परिस्थितीत, आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडले जाते',असंही लष्कर प्रमुख म्हणाले.
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
जनरल द्विवेदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट असल्याचे पुन्हा सांगितले. चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. भारताला शांतता हवी आहे, परंतु दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही देशाला किंवा संघटनेला कडक प्रत्युत्तर मिळेल, असा कडक संदेश त्यांनी दिला.
'ऑपरेशन सिंदूर' ८८ तासांत पूर्ण झाले, यातून भारताची क्षमता दाखवून दिली आहे. "जर पाकिस्तानने आम्हाला आणखी एक संधी दिली तर आम्ही त्यांना आमच्या शेजाऱ्यांशी जबाबदारीने कसे वागायचे ते शिकवू, असंही ते म्हणाले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील अनेक दहशतवादी अड्डे आणि हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले.