'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:03 IST2025-10-14T19:57:29+5:302025-10-14T20:03:49+5:30
Operation Sindoor: पाकिस्तानच्या विनंतीवरुनच भारताने कारवाई थांबवल्याचा पुनरुच्चार जनरल घई यांनी केला.

File Photo
Operation Sindoor: भारतीय लष्कराचे उपप्रमुख राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. राजधानी दिल्लीत आयोजित चीफ कॉन्क्लेव मध्ये UNPKF देशांच्या लष्कर प्रमुख आणि उच्च लष्करी कमांडर्सच्या उपस्थितीत ऑपरेशन सिंदूरवर ऑडिओ-व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. यावेळी जनरल घईंनी संसद हल्ला, उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सर्वांसमोर आणला.
VIDEO | Delhi: “In the strikes carried out in the early hours of May 7, more than 100 terrorists were neutralised,” says Deputy Chief of Army Staff Lt Gen Rajiv Ghai.
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2025
(Full video available on PTI Videos –https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/BTlygoSfA7
नौदल तयारीत...
जनरल घईंनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी केवळ लष्कर आणि वायुसेनाच नाही, तर नौदलही अरब सागराच्या मार्गाने हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. जर पाकिस्तानने युद्ध वाढवण्याची हिंमत दाखवली असती, तर परिस्थिती त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयावह झाली असती. आपल्या सैन्याने पाकिस्तानला उद्ध्वस्त केले असते. पण, पाकिस्तानी डीजीएमओने फोन करुन युद्ध थांबवण्याची विनंती केली होती, त्यामुळेच भारताने कारवाई थांबवली, अशी माहितीही त्यांनी दिली.
VIDEO | Delhi: “India, a key UN peacekeeping contributor, applied its experience in modern conflict during Operation Sindoor, addressing evolving threats and terrorism. It offers valuable military, operational, and humanitarian insights for shaping future peacekeeping doctrine”,… pic.twitter.com/IGnmegGNX4
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2025
नौदलाकडे कोऑर्डिनेट्स होते
नौदलाला पाकिस्तानातील संभाव्य हल्ल्याचे कोऑर्डिनेट्स व माहिती दिली होती. यावेळी जनरल घई यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील उद्ध्वस्त झालेले नऊ दहशतवादी अड्डे आणि अकरा हवाई तळांवर झालेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ आणि फोटो सादर केले. ८८ तासांच्या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमाने, गुप्तचर विमाने आणि वाहतूक विमानांना झालेल्या नुकसानाचीही माहिती देण्यात आली.
VIDEO | Delhi: “Since the 1990s, over 100,000 people, 60,000 families from minorities have been forced to leave Jammu and Kashmir, with 15,000 civilians and 3,000+ security personnel killed. It is clear that where this is coming from. Operation Sindoor was not sudden; past… pic.twitter.com/UzqqDbymKf
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2025
३० हून अधिक देशांचे लष्करप्रमुख सहभागी
या कार्यक्रमात ३० हून अधिक देशांचे लष्करप्रमुख, उपप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी कमांडर सहभागी झाले. यात भूतान, बुरुंडी, इथिओपिया, फिजी, फ्रान्स, घाना, कझाकस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया, पोलंड, श्रीलंका, टांझानिया, युगांडा, उरुग्वे, व्हिएतनाम, अल्जेरिया, आर्मेनिया, बांग्लादेश, ब्राझील, कंबोडिया, इटली, नेपाळ, केनिया, रवांडा, सेनेगल, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, मलेशिया, मोरोक्को, नायजेरिया, थायलंड आणि मादागास्कर यांचा समावेश आहे.