Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:14 IST2025-05-07T15:11:08+5:302025-05-07T15:14:40+5:30
Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
Operation Sindoor ( Marathi News ) : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
भारताच्या कारवाईत ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते. बुधवारी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठकही घेतली. या बैठकीमध्ये पीएम मोदी यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईची माहिती दिली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत. यासोबतच केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हेही त्यांच्यासोबत असतील.