07 May, 25 10:15 PM
''जे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ, ऑपरेशन सिंदूर हा त्याचा पुरावा''
''जे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ, ऑपरेशन सिंदूर हा त्याचा पुरावा'', अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
07 May, 25 09:37 PM
भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
07 May, 25 08:56 PM
नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछ येथे एका गुरुद्वाराचं नुकसान
नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछ येथे एका गुरुद्वाराचं नुकसान, १२ जणांचा मृत्यू, १२ जणांपैकी पाच जण शीख समुदायातील, नरींदर सिंग यांनी दिली माहिती
07 May, 25 08:30 PM
आम्ही संयम पाळणार, तणाव वाढता कामा नये, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले
आम्ही संयम पाळणार, तणाव वाढता कामा नये, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले
07 May, 25 08:08 PM
देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
युद्धसज्जतेचा सराव म्हणून आज देशातील विविध भागात मॉकड्रिक घेण्यात आली, यावेळी अनेक ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आला होता
07 May, 25 07:00 PM
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती शेअर करण्याचं NIA ने लोकांना केलं आवाहन
07 May, 25 06:49 PM
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद"
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. आता पाकिस्तानचे भारतातील स्लिपर्स सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे - उद्धव ठाकरे
07 May, 25 06:28 PM
सैन्याला पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा - राहुल गांधी
आम्ही कार्यकारिणीत यावर चर्चा केली. आमचा सैन्याला पूर्ण पाठिंबा, त्यांना शुभेच्छा. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला उद्या सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे - राहुल गांधी
07 May, 25 06:14 PM
" भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान"
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या शूर सैनिकांच्या धाडसाला, दृढनिश्चयाला आणि देशभक्तीला आम्ही सलाम करतो. दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसने लष्कर आणि सरकारसोबत एकता दाखवली आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक निर्णायक कारवाईला पाठिंबा दिला - मल्लिकार्जुन खरगे
07 May, 25 05:57 PM
तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु, जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर, भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे असं भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आणि 'नॉन-एस्कलेटेबल' उपाययोजनांबद्दल विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी हे विधान केले.
07 May, 25 05:53 PM
अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. त्यांनी रशिया आणि फ्रान्समधील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची आणि संघर्ष रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.
07 May, 25 05:43 PM
"ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विनय नरवालची पत्नी हिमांशी नरवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे. आज आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे आणि हे सिद्ध केलं आहे की, आता पाकिस्तानलाही २६ भारतीय कुटुंबांना झालेल्या वेदनांची जाणीव झाली असेल. आज केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे असं हिमांशी नरवालने म्हटलं आहे.
07 May, 25 05:26 PM
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका
सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे जलसाठे नष्ट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील 9 ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने नीलम नदीच्या नीलम-झेलम धरणावर बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे.
07 May, 25 05:02 PM
ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
ऑपरेशन सिंदूर हे मोदींच्या नेतृत्वात. लष्कर आणि मोदींचे आभार मानतो. जे लक्ष्य होतं ते साध्य केलं. ज्यांनी आपल्या नागरिकांना मारलं, त्यांनाच मारलं असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
07 May, 25 04:49 PM
'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर!
07 May, 25 04:41 PM
शरद पवारांनी केला नरेंद्र मोदींना फोन
07 May, 25 04:29 PM
सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा
ऑपरेशन सिंदूरच्या ब्रीफिंगमध्ये दोन चेहऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, जे भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक बनले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन्ही महिला अधिकारींनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलं. यासोबतच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा कसा खात्मा करत आहे हे देखील सांगितलं.
07 May, 25 04:16 PM
राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल
07 May, 25 04:01 PM
या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी यांनी बोलावलेल्या बैठकीत जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांसह सर्व राज्यांचे डीजीपी आणि मुख्य सचिव या बैठकीत हजर होते.
07 May, 25 03:49 PM
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक
भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला.
07 May, 25 03:49 PM
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक
भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, ज्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाहांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला.
07 May, 25 03:12 PM
जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे.
07 May, 25 02:26 PM
पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जात द्रौपर्दी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली.
07 May, 25 02:24 PM
भारतीय लष्करानं शेअर केला ३० सेंकदचा व्हिडिओ
07 May, 25 02:23 PM
९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री शाहांची बैठक
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावर्ती ९ राज्याच्या मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, राज्य सचिवांची बोलावली बैठक
07 May, 25 01:19 PM
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात
07 May, 25 12:56 PM
आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला असेल - मिलिंद देवरा
आज भारतीय जनतेच्या वतीने, पाकिस्तानला योग्य उत्तर दिल्याबद्दल मी पंतप्रधान, शूर जवान आणि सशस्त्र दलांचे आभार मानतो. पहलगाममध्ये ज्यांनी पती, मुले आणि वडील गमावले आहेत अशा सर्व विधवा, माता आणि मुलींच्या वतीने भारतीय सैन्याने या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे. या ऑपरेशनमुळे प्रत्येक भारतीयाला, विशेषतः महिलांना भारताचा अभिमान वाटला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित राहील असा विश्वास वाटतो - खासदार मिलिंद देवरा, शिवसेना
07 May, 25 12:11 PM
पहलगाम येथे पर्यटकांचा जल्लोष, भारतीय सैन्याच्या शौर्याचं कौतुक
07 May, 25 11:33 AM
पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केल्याचे व्हिडिओ
कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना संबोधित करताना पाकिस्तानच्या ६ किमी अंतरावर असलेल्या सियालकोट इथल्या सरजल कॅम्पसह नष्ट झालेल्या दहशतवादी छावण्यांचे व्हिडिओ सादर केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या ४ कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण मिळाले होते.
07 May, 25 11:03 AM
"गेल्या ३ दशकापासून पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय"
पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलाकडून ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. गेल्या ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतंय - कर्नल सोफिया कुरेशी
07 May, 25 10:52 AM
यापुढेही भारतावर हल्ला होण्याची शक्यता
हल्ल्याच्या एक आठवड्यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पाऊले उचलले नाहीत. उलट भारतावर आरोप लावले. भारताविरुद्ध यापुढेही हल्ले होण्याची शक्यता आहे त्यामुळे याला उत्तर देणे गरजेचे होते - परराष्ट्र सचिव
07 May, 25 10:49 AM
पहलगाम हल्ल्यात पाकचे कनेक्शन - भारत
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर ए तोयबाशी जोडलेला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे संबंध असल्याचं उघड झाले आहे. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. जम्मू काश्मीरात पर्यटन बहरत असताना हेतुपरस्पर हा हल्ला घडवून तिथे नुकसान पोहचवण्याचा हेतू होता - विक्रम मिस्त्री, परराष्ट्र सचिव
07 May, 25 10:13 AM
सशस्त्र दलाचा भारताला अभिमान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले कौतुक
ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा निर्धार मोदी सरकारचा आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
07 May, 25 09:57 AM
'ऑपरेशन सिंदूर' बाबत सरकार देणार माहिती
07 May, 25 09:51 AM
भारत-पाकिस्तान आमचे शेजारी, दोन्ही देशांनी संयम ठेवावा - चीन
भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक आहे. सध्याच्या परिस्थितीवर आम्हाला चिंता वाटते. भारत-पाकिस्तान दोन्ही आमचे शेजारी आहेत. चीन सर्वप्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता, संयम बाळगावा असं आवाहन चीनकडून करण्यात आले आहे.
07 May, 25 09:16 AM
पाकिस्तानी सैन्याचं नापाक कृत्य, भारतीय नागरिकांवर गोळीबार
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान बिथरला, पाक सैन्यातून भारतीय नागरिकांवर गोळीबार, सीमेजवळील गावांवर गोळीबारी सुरू
07 May, 25 09:02 AM
खबरदारी म्हणून जैसलमेर इथं शाळांना सुट्टी जाहीर
भारतीय सैन्याने पाकवर स्ट्राईक केल्यानंतर सीमेजवळील शहरांमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे आज सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे.
07 May, 25 08:41 AM
भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान, राहुल गांधींची प्रतिक्रिया
07 May, 25 08:36 AM
"भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास"
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवला- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री
07 May, 25 07:46 AM
औवेंसींनी केले भारतीय सैन्य दलाच्या हल्ल्याचं स्वागत
भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पोस्ट करत म्हटलंय की, "आमच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या टार्गेट हल्ल्यांचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून पुन्हा कधीही पहलगाम होणार नाही. पाकिस्तानचा दहशतवादी ढाचा पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. जय हिंद!"
07 May, 25 07:43 AM
भारतीय हवाई हल्ल्यात ९० दहशतवादी ठार
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात ८० ते ९० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. बहावलपूर आणि मुरीदके इथं ३० दहशतवादी मारले गेले.
07 May, 25 07:31 AM
जैश ए मोहम्मदचं बहावलपूर येथील मुख्यालय उद्ध्वस्त
मरकज सुभान अल्लाह, जैश ए मोहम्मद बहावलपूर, पंजाब पाकिस्तान, हे मरकज जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करत होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात जैश दहशतवादी संघटनेचा हात होता. पुलवामातील दहशतवाद्यांना या छावणीत प्रशिक्षण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय सैन्याने या ठिकाणावर हल्ला केला आहे.