“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 08:46 IST2025-05-09T08:45:30+5:302025-05-09T08:46:39+5:30

Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या.

operation sindoor jammu kashmir local resident said our forces are giving pakistan a befitting reply and we have trust in our pm and army | “सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास

“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास

Operation Sindoor: रात्री ऑफिसमधून घरी येत असतानाच ब्लॅक आऊट करण्यात आला. काही वेळातच ड्रोन हल्ले सुरू झाले. संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता. पाकिस्तानकडून अशा कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानने असे करणे चुकीचे आहे. भारताचे सैन्य त्यांना सडेतोड उत्तर देत आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या देशाचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान मोदी आणि सैन्याचाही आहे. आम्ही हे युद्ध नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास जम्मू काश्मीरमधील स्थानिकांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक पातळीवर काय घडत आहे, याची माहितीही दिली. 

भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय घडले, समजून घ्या

गुरुवारी सायंकाळनंतर पाकिस्तानने भारताच्या अनेक ठिकाणांवर ड्रोनने हल्ले केले. पहाटेपर्यंत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. यानंतर भारताच्या तिन्ही दलांनी आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानचे सगळे हल्ले नेस्तनाबूत केले. पाकिस्तानने जम्मू काश्मीर ते राजस्थान या भागात केलेले ५० हून अधिक हल्ले भारताने निष्क्रिय केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या कराची, लाहोर यासह अनेक ठिकाणी प्रतिहल्ले केले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले. यातच जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय सैन्यावर विश्वास असून, घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 

जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही

आम्ही रात्री जेवण करत असतानाच आम्हाला हल्ल्याचा आवाज आला. पहाटे ४.३० वाजताही हल्ल्याचे आवाज येत होते. आपल्या सैन्याने त्यांचे हल्ले परतवून लावले. निष्क्रिय केले. आपले सैन्य अलर्ट आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. नागरिकांवर हल्ले करणे योग्य नाही. परंतु, सैन्याशी लढणे पाकिस्तानला शक्य नाही. पाकिस्तानची जी मानसिकता आहे, ते पाहता त्यांच्याकडून हीच अपेक्षा करू शकतो. आम्हाला आमच्या सैन्यावर विश्वास आहे, असे जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांनी म्हटले आहे. 

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

दरम्यान, रात्री सुमारे ८ वाजता तीन ते चार ड्रोन पाहिले. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरू होता. पाकिस्तानने हे योग्य केलेले नाही. पाकिस्तानची ही चूकच आहे. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. पुढे काय होते, हे आता पाहावे लागेल, असेही एका नागरिकाने म्हटले आहे. 

Web Title: operation sindoor jammu kashmir local resident said our forces are giving pakistan a befitting reply and we have trust in our pm and army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.