शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश, दहशतवादाविरोधातील भूमिका कठोरच राहणार; पाकिस्तानला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता जर पाकिस्तानकडून काही आगळीक करण्यात आली तर अशा प्रत्येक आगळीकीला कठोर प्रत्युत्तर द्या. ‘वहां (पाकिस्तान) से गोली चलेगी, तो यहां (भारत) से गोला चलेगा’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका यापुढेही कठोरच राहील. पाकिस्तानला आता दहशतवादाची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देत राहिला, तर त्याने सहकार्याची अपेक्षा अजिबात ठेवू नये, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

काश्मीरसंदर्भात भारत कधीही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. पाकिस्तानने त्याच्या बेकायदेशीर ताब्यातील भाग भारताला परत करावा, हाच चर्चेचा एकमेव मुद्दा असेल, असेही सांगण्यात आले. शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करून केली होती. ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. 

उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी घेतला शस्त्रसंधीचा आढावा

भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधी स्वीकारल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत सीमेवर पाक शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला. 

पाकिस्तानने याबाबत योग्य ती पावले उचलावीत आणि या स्थितीत गांभीर्याने व जबाबदारीने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह लष्कराच्या तिन्ही विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान या दोघांनीही ही शस्त्रसंधी स्वीकारल्यानंतर ती लागू करण्यात आली असली तरी या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती काय असेल, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

डीजीएमओ पातळीवरच चर्चा : पाककडून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर सिंधू जल करार स्थगितच राहील. पाकिस्तानशी संवाद केवळ लष्करी अभियान महासंचालक (डीजीएमओ) पातळीवरच होईल. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला