शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 01:33 IST

या क्रमवारीत भारताला 'मेजर पॉवर' (Major Power) चा दर्जा मिळाला आहे...

भारताने प्रतिष्ठित एशिया पॉवर इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून, या क्रमवारीत त्याला 'मेजर पॉवर' (Major Power) चा दर्जा मिळाला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मधील कामगिरीच्या आधारावर लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात भारताला ही रँकिंग मिळाली आहे. 'सुपरपॉवर'चे पहिले दोन क्रमांक अनुक्रमे अमेरिका आणि चीनने कायम राखले आहेत. २०२४ मध्ये, भारताला ३८.१ च्या एकत्रित गुणांसह 'मिडिल पॉवर्स'मध्ये स्थान देण्यात आले होते. या वर्षीच्या अहवालात, भारताला १०० पैकी ४० गुण मिळाले आहेत. 

या यादीत ३८.८ आणि ३२.१ गुणांसह जपान आणि रशिया अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. तथापि, ७३.७ गुणांसह असलेल्या चीनच्या तुलनेत भारत अजूनही बराच मागे आहे. तर अमेरिका ८०.५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

वाढलेल्या आर्थिक आणि लष्करी क्षमतेचा परिणाम -तपशीलवार मूल्यांकनानुसार, आर्थिक (Economic) आणि लष्करी (Military) क्षमतांमधील वाढीमुळे भारताचा रँक वाढला आहे. 'इनवर्ड इन्व्हेस्टमेंट'मधील वाढीमुळे भारत आर्थिक दृष्ट्या नवव्या स्थानावर पोहोचला. आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी, लीव्हरेज आणि तांत्रिक विकासामधून भारताचे भू-राजकीय (Geopolitical) महत्त्व वाढल्याचे इन्स्टिट्यूटने नमूद केले. याशिवाय, लष्करी क्षमतांमधील सातत्यपूर्ण वाढही त्यांनी अधोरेखित केली.

ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीचा प्रभाव -मे २०२५ मध्ये सुरू झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मधील भारताच्या कामगिरीमुळे तज्ज्ञांच्या मूल्यांकनावर प्रभाव पडला असावा. मात्र, या ऑपरेशनने भारताचा अलीकडील युद्ध अनुभव वाढला. मात्र, 'डिफेन्स नेटवर्क'च्या बाबतीत भारताची सर्वाधिक घसरण दिसली असून, रँक ११ व्या स्थानावर आला आहे (२०२४ च्या तुलनेत दोन रँकने खाली). फिलिपिन्स आणि थायलंडने भारताला मागे टाकले आहे.

गुंतवणुकीच्या बाबतीत चीनला मागे टाकले -इंडेक्सनुसार, अमेरिकेनंतर सर्वाधिक 'इनवर्ड इन्व्हेस्टमेंट' आकर्षित करण्यात भारताने चीनला मागे टाकले आहे. इन्स्टिट्यूटच्या निष्कर्षानुसार, संरक्षण भागीदारी (Defense Partnership) निर्माण करण्याच्या बाबतीत आव्हाने कायम असली तरी, अलीकडील लष्करी अनुभव आणि आर्थिक गतीमुळे भारताची प्रादेशिक स्थिती मजबूत झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor Boosts India's Military Ranking in Asia Power Index

Web Summary : India secures third rank in Asia Power Index, termed 'Major Power'. Boosted by economic, military growth, and 'Operation Sindoor' success. Investment surpasses China, enhancing regional standing despite defense network dip.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूरchinaचीनAmericaअमेरिका