Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:20 IST2025-11-08T12:16:12+5:302025-11-08T12:20:19+5:30

Operation Pimple : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Operation Pimple security forces foiled infiltration in keran sector of kupwara in jammu and kashmir killed two terrorist | Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लष्कराच्या व्हाईट चिनार कॉर्प्सने एक्सवरील एका पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी Operation Pimple सुरू करण्यात आलं. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना घेराव घालून त्यांचा खात्मा करण्यात आला.

या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर सुरक्षा दल परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शुक्रवारी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली. जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या, अंदाधुंद गोळीबार झाला. चिनार कॉर्प्सने सांगितलं की, लष्कराने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. ५ नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील छत्रू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या मदतीने जम्मू आणि काश्मीर पोलिसांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही चकमक सुरू झाली. या आधारे छत्तरू परिसरात संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली. ही समन्वित शोध मोहीम पहाटे सुरू झाली, त्यानंतर सुरक्षा दलांवर गोळीबार झाला आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला.

व्हाईट नाईट कॉर्प्सने X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ऑपरेशन छत्तरू अंतर्गत गुप्तचर माहितीच्या आधारे सकाळी एक मोहीम राबवण्यात आली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने, व्हाईट नाईट कॉर्प्सच्या जवानांनी छत्तरू परिसरात दहशतवाद्यांना घेरलं. ही मोहीम सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी आणि कारवाया पुन्हा वाढल्या आहेत.

Web Title : ऑपरेशन पिंपल सफल: कुपवाड़ा में दो आतंकवादी मारे गए

Web Summary : कुपवाड़ा के केरन सेक्टर में सुरक्षा बलों ने घुसपैठ की कोशिश को नाकाम करते हुए दो आतंकवादियों को मार गिराया। खुफिया जानकारी मिलने के बाद ऑपरेशन पिंपल शुरू किया गया। तलाशी अभियान जारी है। इससे पहले, किश्तवाड़ में सुरक्षा बलों और आतंकवादियों के बीच झड़प हुई, जिससे जम्मू और कश्मीर में बढ़ी हुई गतिविधि का पता चलता है।

Web Title : Operation Pimple Success: Two Terrorists Eliminated in Kupwara

Web Summary : Security forces foiled an infiltration attempt in Kupwara's Keran sector, eliminating two terrorists. Operation Pimple was launched following intelligence inputs. Search operations are ongoing. Earlier, a clash occurred in Kishtwar between security forces and terrorists, highlighting increased activity in Jammu and Kashmir.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.