शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यासाठी फक्त ३५ मिनिटं सूट

By मोरेश्वर येरम | Published: December 02, 2020 6:28 PM

रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत. 

ठळक मुद्देहवेची गुणवत्ता खराब असणाऱ्या शहरांमध्ये फटके फोडण्यावर पूर्णपणे बंदीहवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या ठिकाणी ३५ मिनिटं फटाके फोडता येणारप्रदुषण आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री आणि खरेदी बंदीचा निर्णय

नवी दिल्लीनॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) संपूर्ण देशभरात हवेच्या खराब गुणवत्तेमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे फटाक्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पण ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्याची परवानगी देखील दिली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे यातही ३१ डिसेंबरच्या रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत. 

दिल्ली, एनसीआर यासारख्या देशातील हवेची गुणवत्ता खराब असलेल्या शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी असल्याचं एनजीटीचे अध्यक्ष आणि न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी सांगितलं. हवेची गुणवत्ता चांगली असणाऱ्या शहरांमध्ये ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ११.५५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंतच्या कालावधीत पर्यावरणपुरक फटाके फोडण्यास मूभा देण्यात आल्याचंही ते पुढे म्हणाले. बंदी घालण्यात आलेल्या फटाक्यांची खरेदी आणि विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, यंदा प्रदुषणासह कोविड संकटामुळे दिवाळीत देशात अनेक शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. यात ९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत दिल्ली आणि एनसीआरमध्ये फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घातले होते. त्यानंतर दिल्ली सरकारनेही फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही महापालिकेने तातडीने निर्णय घेत दिवाळीत फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली होती. महापालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास किंवा आतिषबाजी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मध्यम स्वरुपाचे फटाके फोडण्यास सवलत देण्यात आली होती. 

टॅग्स :fire crackerफटाकेNew Yearनववर्ष