VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 03:01 PM2024-05-25T15:01:29+5:302024-05-25T15:03:01+5:30

कर्नाटकच्या रस्त्यावरील गँगवॉरचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तरुण एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.

One person injured in fight between two groups in Karnataka Udupi video viral | VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

Karnataka Gangwar Video :कर्नाटकच्या उडपीमध्ये भररस्त्यात गँगवॉर सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात मध्यरात्री तरुणांच्या टोळक्यांनी तलवारींचे वार करत एकमेकांच्या अंगावर गाड्या घातल्या. तिथल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.  सगळ्या प्रकारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. दुसरीकडे यावरुन राजकीय वातावरण देखील तापलं आहे. भाजपने हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसला लक्ष केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी काहींना अटक केली तर काही फरार झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.

आठवड्याभरापूर्वी उडुपी आणि मणिपाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हे गँगवॉर झाल्याचे म्हटलं जात आहे. दोन्ही टोळक्यांनी
महामार्गावर कार उभी करून एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेची चिरफाड करणारा  हा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. भाजपने त्याला ‘कर्नाटक मॉडेल’ असे म्हटले आहे.

अंगावर काटा आणणार हा व्हिडीओ कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगचा नसून कर्नाटकातल्या गँगवॉरचा आहे. व्हिडीओमध्ये दोन गटांमध्ये गँगवॉर सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सुरुवातीला समोरून एक कार येते आणि तिथे असलेल्या दुसऱ्या कारला धडकते. दोन्ही कारमधून हल्लेखोर बाहेर येतात आणि एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करू लागतात. त्यानंतर दुसऱ्या कारमधून  काही लोक कारमधून बाहेर पडले आणि जोरदार हल्ला केला. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कारनं दुसऱ्या कारमधील एका तरुणाला उडवलं. कारने चिरडल्यानंतर ती व्यक्ती जखमी होऊन जमिनीवर निपचित पडली होती. तरुणाला चिरडल्यानंतर काही तरुणांनी पुन्हा कशाने तरी त्याच्यावर हल्ल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या गाडीतील सहकाऱ्यांनी जखमी सदस्याला उचलून आत घेतले.

दरम्यान, भाजपने हा व्हिडीओ पोस्ट करत गँगवॉर, मुलींवर अत्याचार, हत्या, बॉम्बस्फोट, रेव्ह पार्टी, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा हे सगळं कर्नाटक काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात होत आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांना देखील टॅग करण्यात आले आहे. सरकारने पोलिसांना मोकळीक न देता हातातल्या बाहुल्या बनवल्याने आज असं वातावरण आहे. हेच कर्नाटक मॉडेल काँग्रेस देशाला दाखवत आहे, असे  भाजपने म्हटले आहे. 

Web Title: One person injured in fight between two groups in Karnataka Udupi video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.