मिठाईच्या डब्यात मिळालेले १० लाख महिलेने केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 05:10 IST2020-11-20T05:09:22+5:302020-11-20T05:10:02+5:30
कांतीनगर प्रभागात रोशनी नावाच्या या कर्मचाऱ्याला एका ज्येष्ठ नागरिकाने मिठाईच्या डब्याऐवजी पैशाने भरलेली पिशवी दिली.

मिठाईच्या डब्यात मिळालेले १० लाख महिलेने केले परत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मिठाईच्या डब्यात मिळालेले १० लाख रुपये पुन्हा परत करून स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर ठेवले आहे. पूर्व दिल्लीतील महापालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार महापौर निर्मल जैन यांच्याकडून करण्यात येणार आहे.
कांतीनगर प्रभागात रोशनी नावाच्या या कर्मचाऱ्याला एका ज्येष्ठ नागरिकाने मिठाईच्या डब्याऐवजी पैशाने भरलेली पिशवी दिली. जेव्हा ती महिला घरी परत आली तेव्हा तिने पिशवी उघडली. त्यात दहा लाख रुपये होते. या महिला कर्मचाऱ्याने तातडीने स्वच्छता अधीक्षकांना याची माहिती दिली. यानंतर दोघेही नगरसेवक कांचन माहेश्वरी यांच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिकाला बोलवण्यात आले व त्यांचे दहा लाख रुपये परत केले.