शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेसाठी एक लाख सुरक्षा जवान; सुरक्षा दलांच्या २५० कंपनी मागविल्या, सुरक्षाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:44 IST

भाविकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सुरेश एस. डुग्गर -

जम्मू : संपूर्ण जगभरातून भाविक येत असलेल्या अमरनाथ यात्रेला अद्याप ३ महिन्यांचा कालावधी असला तरी तयारीने वेग घेतला आहे. यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.

भाविकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकृतरीत्या सुरक्षा दलांच्या २५० कंपनी सुरक्षेसाठी मागविण्यात आल्या आहेत. यात सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान असतील. लष्कर व राज्य पोलिस जवानांना अतिरिक्तरीत्या तैनात करण्यात येणार आहे.

यंदा ३ जुलै ते ९ ऑगस्ट यात्राअमरनाथ श्राईन बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी अमरनाथ यात्रेत खूपच गर्दी होण्याची शक्यता आहे.तीन जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा नऊ ऑगस्ट म्हणजेच श्रावण पौर्णिमेपर्यंत चालेल.यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. सहभागी होणाऱ्यांना उत्तम प्रकृती असण्याशिवाय कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. १० लाखांपेक्षा अधिक लोकांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राSoldierसैनिक