"एका हाताने टाळी वाजत नाही..."; बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:07 IST2025-05-29T14:07:04+5:302025-05-29T14:07:33+5:30

या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने युवकाला अंतरिम जामीन देत काही अटी घातल्या. त्यात त्याने महिलेशी संपर्क करू नये आणि त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये असं सांगितले आहे.

"One hand does not clap..."; Supreme Court granted interim bail to a 23-year-old influencer accused of raping a 40-year-old woman | "एका हाताने टाळी वाजत नाही..."; बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

"एका हाताने टाळी वाजत नाही..."; बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

नवी दिल्ली - लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध बनवल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या २३ वर्षीय युवकाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. या युवकावर ४० वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. युवक ९ महिने जेलमध्ये राहिला तरीही त्याच्याविरोधातील आरोप निश्चित झाले नाहीत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याला अंतरिम जामीन दिला आहे. त्याशिवाय याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बीवी नागरत्ना आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना फटकारले आहे.

कोर्टाने म्हटलं की, जेव्हा महिला स्वत:च्या मर्जीने युवकासोबत गेली होती मग पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा कसा नोंदवला? एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्ही भारतीय दंड संहिताचे कलम ३७६ अंतर्गत गुन्हा कोणत्या आधारे दाखल केला, ती छोटी मुलगी नाही, ४० वर्षाची आहे. हे दोघे एकत्र जम्मूला गेले होते. जेव्हा महिला आणि युवकामध्ये संबंध सुरू होते तेव्हा ती विवाहित होती. भलेही ती पतीपासून वेगळी राहत होती परंतु तिचा घटस्फोट झाला नव्हता. नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर कायद्याचा दुरुपयोग करून असे खटले दाखल केले जातात. त्यामुळे ना केवळ कोर्टावर ताण येतो, तर या गुन्ह्यातील आरोपीच्या प्रतिमेवरही डाग पडतो असं त्यांनी सांगितले.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने युवकाला अंतरिम जामीन देत काही अटी घातल्या. त्यात त्याने महिलेशी संपर्क करू नये आणि त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये असं सांगितले आहे. महिला आणि युवक पहिल्यांदा २०२१ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. ही महिला तिच्या कपड्यांचे ब्रॅडिंग करण्यासाठी सोशल मिडिया इन्फ्लुएंसरचा शोध घेत होती तेव्हा युवकाने तिला कन्टेन्ट बनवण्यासाठी आयफोनची मागणी केली. त्यानंतर महिलेने जम्मूच्या एका Apple स्टोअरमधून त्याला आयफोन दिला. 

आरोपीने फोन विकण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी युवक महिलेच्या नोएडा येथील घरी आला. २० हजार परत देण्याच्या बहाण्याने तिला शूटसाठी घेऊन गेला. रस्त्यात महिलेला गुंगीचे औषध मिसळून मिठाई खायला दिली तेव्हा ती बेशुद्ध झाली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करू लागला. आरोपी युवकाने महिलेला ब्लॅकमेल करून अनेकदा जम्मूला घेऊन गेला असा आरोप महिलेने तक्रारीत केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी ट्रायल कोर्टात हा खटला चालवण्यास परवानगी देत आरोपीला अंतरिम जामीन दिला आहे.

Web Title: "One hand does not clap..."; Supreme Court granted interim bail to a 23-year-old influencer accused of raping a 40-year-old woman