लेकाने कष्टाने दीड लाख जमवले, आईने चुकून भंगारवाल्याला दिले; फिल्मी स्टाईलने मिळाले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:48 IST2026-04-02T11:47:20+5:302026-04-02T11:48:38+5:30

एका तरुणाच्या आईने चुकून दीड लाख भंगारात विकले. तरुणाने दीड वर्षात पै-पै जमवून साठवलेले पैसे काही मिनिटांत भंगारामध्ये गेले.

one and half lakh cash junk dealer | लेकाने कष्टाने दीड लाख जमवले, आईने चुकून भंगारवाल्याला दिले; फिल्मी स्टाईलने मिळाले परत

AI फोटो

पंजाबच्या जलालाबादमधून एक अजब-गजब घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या आईने चुकून दीड लाख भंगारात विकले. तरुणाने दीड वर्षात पै-पै जमवून साठवलेले पैसे काही मिनिटांत भंगारामध्ये गेले. मात्र या प्रकरणातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते दीड लाख रुपये तीन वेगवेगळ्या हातांतून फिरूनही त्या तरुणाला पुन्हा सुखरूप मिळाले. 

जलालाबादमधील फलियावाला गावात ही घटना घडली आहे. कमरेवाला गावात राहणारा एक तरुण शेलरमध्ये काम करतो. त्याने आपल्या मेहनतीची कमाई चोरीला जाण्याच्या भीतीने सुक्या भाकऱ्यांच्या एका पिशवीत लपवून ठेवली होती. जेव्हा तरुण कामावर गेला, तेव्हा त्याच्या आईने घरातील भंगारासोबत ती भाकऱ्यांची पिशवीही भंगारवाल्याला विकून टाकली.

तरुण कामावर असताना 'राज कुमार' नावाचा फेरीवाला त्यांच्या गल्लीत आला होता. यावेळी तरुणाच्या आईने भंगारासोबत ती भाकऱ्यांची पिशवीही त्याला दिली. फेरीवाल्याने हे सर्व सामान एका मोठ्या भंगार विक्रेत्याला विकलं. त्यानंतर त्या मोठ्या भंगार विक्रेत्याने त्या सुक्या भाकऱ्या एका डेअरी चालकाला विकल्या, जेणेकरून त्या गुरांना चारा म्हणून उपयोगात येतील.

जेव्हा तरुण कामावरून घरी परतला, तेव्हा त्याने आईला त्या भाकऱ्यांच्या पिशवीबद्दल विचारलं. आईने ती पिशवी भंगारवाल्याला दिल्याचं सांगताच तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने भंगारवाल्याचा शोध सुरू केला. सुदैवाने त्याला तो फेरीवाला राज कुमार सापडला. तरुणाने त्याला सर्व गोष्ट सांगितली. त्याने प्रामाणिकपणा दाखवत डेअरी चालकाकडून ती भाकऱ्याची पिशवी परत मिळवली. पिशवी उघडून पाहिली असता त्यात सर्व पैसे सुरक्षित होते, जे त्या तरुणाला परत केले.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे, ही पिशवी ज्या ज्या लोकांकडे गेली, त्यापैकी कोणीही ती उघडून पाहिली नाही. मोहकम अराईया गावाचे सरपंच परमिंदर सिंह यांनी या अनोख्या घटनेची पुष्टी केली आहे. पैसे परत मिळाल्यावर तो तरुण भावूक झाला. तो म्हणाला, "मी विटा उचलून आणि मेहनत करून हे पैसे जमा केले होते. माझ्या कष्टाची कमाई आज मला परत मिळाली."

Web Title : माँ ने गलती से बेटे की बचत बेची, चमत्कारिक ढंग से पैसे वापस मिले।

Web Summary : पंजाब में, एक माँ ने अनजाने में अपने बेटे की ₹1.5 लाख की बचत को स्क्रैप के रूप में बेच दिया। एक रोटी के बैग में छिपे हुए, पैसे कई हाथों से गुजरे लेकिन स्क्रैप डीलर की ईमानदारी के कारण सुरक्षित रूप से वापस आ गए। बेटे ने अभिभूत होकर अपनी मेहनत की कमाई वापस पा ली।

Web Title : Mother Mistakenly Sells Son's Savings, Money Miraculously Recovered.

Web Summary : In Punjab, a mother unknowingly sold her son's ₹1.5 lakh savings as scrap. Hidden in a bread bag, the money passed through several hands but was returned safely due to the scrap dealer's honesty. The son, overwhelmed, gratefully received his hard-earned money back.