शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 07:59 IST

Punjab Crime News: काही महिन्यांपूर्वी मेरठमध्ये निळ्या ड्रममध्ये लपवलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून तो मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

काही महिन्यांपूर्वी मेरठमध्ये निळ्या ड्रममध्ये लपवलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून तो मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंजाबमधील लुधियाना येथे एका निळ्या ड्रममध्ये लपवलेल्या स्थितीत हा मृतदेह सापडला आहे.

येथील शेरपूर परिसरामध्ये एका ड्रममधून दुर्गंध येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केला असता त्या निळ्या रंगाच्या ड्रममध्ये हा मृतदेह सापडला. हा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. तसेच या मृतदेहाचे पाय आणि गळा दोरीने बांधलेला होता.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी कुलवंत कौर यांनी सांगितले की, मृतदेहाच्या चेहऱ्यावरून तो एखादा प्रवासी असण्याची शक्यता आहे. हा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या शरीराव अन्य कुठल्याही खाणाखुणा दिसून आलेल्या नाहीत. मात्र मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले असावेत, अशी शक्यता आहे.

दरम्यान, हा मृतदेह लपवून ठेवण्यासाठी वापरलेला ड्रम हा अगदी नवा असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही हत्या अत्यंत नियोजनबद्धरीत्या करण्यात आली असावी, तसेच मृतदेह लपवण्यासाठी नवा ड्रम खरेदी करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहेत. त्यामुळे या ड्रमच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी लुधियानामधील ड्रम तयार करणाऱ्या ४२ कंपन्यांची यादी तयार केली असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

तसेच घटनास्थळापासून पाच किमी परिसरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रिकरणाची पडताळणीही पोलिसांकडून केली जात आहे. त्याबरोबरच रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि शहरातील अन्य काही भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून संशयास्पद हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब