शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप-काँग्रेसने लावला कुमाऊंत जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 1:14 PM

विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

रवी टाले -नैनिताल : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी कुमाऊं विभागातील २९ जागांसाठी विशेष जोर लावला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमसिंग नगर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रुद्रपूरमध्ये, तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खटीमा, हल्द्वानी आणि श्रीनगर येथे प्रचारसभांना संबोधित केले. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसला कुमाऊं हा जुना बालेकिल्ला परत मिळवायचा आहे, तर भाजपपुढे गत निवडणुकीत त्या विभागातून मिळविलेल्या २४ जागांपैकी जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे परत घेऊनही, कुमाऊं विभागातील उधमसिंग नगर आणि नैनिताल या दोन जिल्ह्यांत भाजपला शेतकरी आंदोलनाची धग अजूनही जाणवत आहे. उत्तराखंडच्या दोन विभागांपैकी गढवालमध्ये ४१, तर कुमाऊंमध्ये २९ जागा असल्याने कोणताही सत्ताकांक्षी पक्ष एकाही विभागाकडे दुर्लक्ष करण्याचा धोका पत्करू शकत नाही. गढवालमध्ये चार धाम महामार्ग, ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे  प्रकल्पासह केंद्र सरकारचे इतरही काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याने, त्या विभागात भाजपची स्थिती कुमाऊंच्या तुलनेत उजवी आहे. बहुधा त्यामुळेच पंतप्रधान मोदींसह भाजपच्या स्टार प्रचारकांनी प्रारंभी गढवाल विभागात प्रचारसभा घेतल्या, तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कुमाऊंवर लक्ष केंद्रित केले.

कुमाऊंमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (खटीमा), माजी मुख्यमंत्री हरीश रावत (लालकुआं), काँग्रेसचे दलित नेता यशपाल आर्य (बाजपूर), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल (श्रीनगर), माजी मुख्यमंत्री के. सी. खंडुरी यांची कन्या रितू खंडुरी (कोटद्वार)  

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस