शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Omicron Variant : ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक, म्हणूनच तो घातक नाही; ICMR च्या तज्ज्ञ पॅनलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 3:46 PM

Omicron Variant : ज्यांच्या बदललेल्या स्वरूपांमध्ये लक्षणं कमी असतात आणि त्यामुळेच त्यांचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. परंतु ते आपला प्रभाव दाखवू शकत नाही, डॉ. समीरन पांडा यांचा दावा.

Omicron Variant India : गेल्या काही दिवसांमध्ये देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटचे काही रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतही आणि अन्य काही देशांमध्ये प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं योग्य त्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. परंतु या विषाणूच्या नव्या व्हेरिअंटची आक्रमकता हाच त्याचा कमकुवतपणा असल्याचा दावा आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी केला आहे. "ज्या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होतो, तो घातक असू शकत नाही. वैज्ञानित तथ्यांची पडताळणी करून हे सांगितलं जात आहे. त्यामुळे या विषाणूच्या बदलत्या स्वरूपाला घाबरण्याचं कारण नाही. परंतु लोकांनी सतर्क राहत योग्य ती काळजी घेतली पाहिजे," अशी माहिती आयसीएमआरचे चीफ एपिडमोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा यांनी सांगितलं."ज्या स्वरूपांमध्ये अधिकाधिक प्रसार होण्याची क्षमता होती, त्यांचा लोकांवर परिणाण कमी झाला आहे, हे ओमायक्रॉन व्हेरिअंटपासून डेल्टा आणि अन्य व्हेरिअंटच्या आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार समोर आलं आहे," असं पांडा म्हणाले. अमर उजालानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "ज्या बदललेल्या स्वरूपांमध्ये लक्षणं हलकी असतात, त्यांच्या संसर्गाची क्षमता अधिक असते. त्यांचा अधिक परिणाम होत नाही. जो विषाणू अधिक घातक असतो आणि त्यामुळे संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होतो, परंतु अशा मृत व्यक्तीकडूनही संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा तितक्या तेजीनं होत नाही, जितका सुरूवातीच्या टप्प्यात ओमायक्रॉनच्या बाबतीत पहायाला मिळालाय," असंही त्यांनी स्पष्ट केलं.लसीकरण, मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाचीभारतात जितक्या प्रमाणात याचे रुग्ण दिसतील त्याचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि कोविड प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचं पालन हा उपाय आहे. या व्हेरिअंटचा यापूर्वीच्या व्हेरिअंट इतक्याच वेगानं प्रसार होत आहे. यापूर्वीच्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी जे उपाय आणि पद्धतीचा अवलंब करण्यात आला तेच उपाय यावर लागू होतील. अशातच लोकांनी घाबरण्यापेक्षा महासाथीपासून बचाव करण्यासाठी असलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं.काय म्हणाल्या शोध लावणाऱ्या वैज्ञानिक?"या व्हेरिअंटचा प्रसाराचा वेग पूर्वीच्या व्हेरिअंटच्या तुलनेत अधिक आहे. परंतु हा व्हेरिअंट डेल्टा इतका घातक नाही. सुरुवातीलाच लक्षणं दिसल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची गरजही पडत नाही. परंतु याची लक्षणं डेल्टा व्हेरिअंटपेक्षा निराळी आहेत," असा दावा जगात सर्वप्रथम ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या साऊथ आफ्रिकन मेडिकल काउन्सिल असोसिएशनच्या चेअरपर्सन डॉ. एंजेलिक कोएट्जी यांनी केला.

७ लसींमुळे धोका नाहीकाही संशोधनांमध्ये कालांतरानं लस दिलेल्यांमध्येही कोविड संसर्गाविरोधात सुरक्षा कमी होत असल्याचे संकेत मिळाले होते. यामुळेच ज्यांना अधिक धोका आहे अशा व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात यावा असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं. परंतु तिसरा डोस घेतल्यानंतर त्यापासून किती सुरक्षा वाढेल याबाबत अधिक संशोधन झालेलं नाही. ऑक्सफर्ड, फायझर, नोवावॅक्स, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, वलनेवा आणि क्योरवॅक या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा समावेश असल्याचं लॅन्सेटमध्ये गुरूवारी छापण्यात आलेल्या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत