CoronaVirus : धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून भारतात परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:42 AM2021-12-03T09:42:12+5:302021-12-03T09:43:11+5:30

सांगण्यात येते, की कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले. यांपैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांपैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Omicron Variant jaipur four members of a family returned from south africa infected with corona virus | CoronaVirus : धक्कादायक! ओमायक्रॉनची दहशत वाढली; द. आफ्रिकेतून भारतात परतलेले एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिकात्मक फोटो.

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संपूर्ण जगाचीच चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचे दोन रुग्ण भारतात सापडले आहेत. यातच, आता दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानच्या जयपूरमध्ये परतलेले एकाच कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

सांगण्यात येते, की कुटुंबातील 9 सदस्य 25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतले. यांपैकी आई-वडील आणि त्यांच्या 8 वर्षे आणि 15 वर्षे वयाच्या दोन मुलींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे, या लोकांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांपैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले -
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. ओमायक्रॉनच्या दृष्टीने सर्वांनाच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही. ते कोरोनाच्या कुठल्या व्हेरिअंटने संक्रमित झाले आहेत, हे अहवाल आल्यानंतरच निश्चित होईल. तथापि, सर्व वयस्कांना लसीचे दोन्ही डोस मिळाले असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.

भारतात आढळले ओमायक्रॉनचे दोन रुग्ण -
कोरोनाच्या धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटने भारतात प्रवेश केला आहे. कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय 66 आणि 44 वर्ष आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. याच बरोबर जगाचा विचार केल्यास, सुमारे 29 देशांमध्ये ओमायक्रॉनचे 373 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे जे लोक 'जोखमी' असलेल्या देशांतून येत आहेत, त्यांना विमानतळावर RTPCR टेस्ट करणे आवश्यक आहे.

दिल्ली एअरपोर्टवर आढळले 6 संक्रमित रुग्ण -
यापूर्वी, दिल्ली विमानतळावर 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. गुरुवारी दिल्ली विमानतळावर एकूण 3000 आंतरराष्ट्रीय प्रवासी उतरले. आता त्यांपैकी 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा -

भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं

ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

 

 

Web Title: Omicron Variant jaipur four members of a family returned from south africa infected with corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.