शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले

वृद्ध प्रॉपर्टी डीलर दाम्पत्यास लुटले
झिंगाबाई टाकळीतील घटना : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
नागपूर : बाथरुमच्या दरवाज्याला छिद्र पाडून आत प्रवेश केलेल्या आरोपींनी वृद्ध प्रॉपर्टी डीलर आणि त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे एक लाखाचे दागिने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री झिंगाबाई टाकळीच्या गीतानगरात घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
प्रकाश चंद्रिकापुरे (५८) हे गीतानगरात राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि सून राहतात. गुरुवारी रात्री चंद्रिकापुरे आणि त्यांची पत्नी घरी होते. त्यांचा मुलगा कामानिमित्त बल्लारशाला गेला होता तर सून माहेरी गेली होती. रात्री १ ते २.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी बाथरुमच्या दरवाज्याला कटरच्या साहाय्याने छिद्र पाडले. छिद्रातून तार टाकून दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर त्यांनी घरात आत प्रवेश केला. सुरुवातीला चोरट्यांनी घरातील दागिने शोधले. परंतु त्यांना काहीच आढळले नसल्याने ते चंद्रिकापुरे यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांचा गोंधळ ऐकून चंद्रिकापुरे दाम्पत्याला जाग आली. आरोपींनी त्यांना शस्त्र दाखवून दागिने काढण्यास सांगितले. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चंद्रिकापुरे यांनी आठवडाभरापूर्वीच सोन्याची चेन तयार केली होती. त्यांनी चेन, अंगठी, पत्नीचे मंगळसूत्र, टॉप्स आरोपींना दिले. आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या चंद्रिकापुरे दाम्पत्याने काही वेळानंतर शेजारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. गिट्टीखदानचे रात्रपाळी अधिकारी के. डी. भगत आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी बाईकवर आले असल्याने त्यांचा सुगावा लागला नाही. चंद्रिकापुरे प्रॉपर्टी डीलर असल्याचे तसेच त्यांचा परिवार बाहेरगावी गेल्याची माहिती आरोपींना असल्याची पोलिसांना शंका आहे.
................