शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"दोन-तीन महिन्यांत तेल आणि खतांचा साठा संपणार...!"; अमेरिका-इराण युद्धावरून माजी RAW प्रमुखांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:55 IST

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची 'हत्या' आहे. हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतासमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात, असा गंभीर इशारा 'रॉ'चे (RAW) माजी प्रमुख विक्रम सूद यांनी दिला आहे. एएनआयसोबत बोलताना सूद म्हणाले, "2 ते 3 महिन्यांत आव्हाने जाणवतील, जेव्हा आपल्याकडचे तेल आणि खते (फर्टिलायझर्जस) संपतील. भारताला मिळणारा बहुतांश एलएनजी (LNG) पुरवठा कतारमधून, तर कच्च्या तेलाचा पुरवठा सौदी अरेबिया आणि मध्यपूर्वेतील देशांतून होतो. जर हा पुरवठा खंडित झाला किंवा चढ्या दराने मिळाला, तर देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढेल. हे संकट हाताळणे सरकारसाठी मोठे आव्हान ठरेल. 

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची 'हत्या' आहे. हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.

भारतासाठी होर्मुजची सामुद्रधुनी महत्वाची - भारताचे इस्रायलसोबत मैत्रीचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जवळचे संबंध आहेत. मात्र असे असले तरी, इराणवर होणारे हल्ले दुर्दैवी आहेत. ते पुढे म्हणाले, "भारत इराणवर नाही, तर 'होर्मुजच्या सामुद्रधुनीवर' (Strait of Hormuz) अवलंबून आहे. हा मार्ग बंद झाल्यास भारताच्या तेल आयातीवर मोठा परिणाम होईल." हे संकट इराणने किंवा भारताने स्वतःहून ओढवून घेतलेले नाही तर, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे भारतावर लादले गेले आहे," असेही ते म्हणाले.

अमेरिकेने या संघर्षात सामील होणे हे एका देशाविरुद्ध 'अघोषित युद्ध' पुकारण्यासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमेरिका आणि इस्रायलला सुरुवातीपासूनच इराणची शक्ती ओळखण्यात अपयश आले. इराण या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करत असून, हे युद्ध म्हणजे इराणला पूर्णपणे संपवून या क्षेत्राची कमान इस्रायलच्या हाती देण्याचा डाव आहे का, हे केवळ काळच ठरवेल, असे सूद यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India faces oil, fertilizer shortage amid US-Iran conflict: RAW Ex-Chief

Web Summary : Ex-RAW chief warns India faces critical oil, fertilizer shortages within months due to US-Iran conflict disrupting Middle East supplies. Rising inflation poses government challenges. Strait of Hormuz closure would severely impact Indian oil imports, a crisis triggered by US-Israeli actions.
टॅग्स :IranइराणWarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायलInflationमहागाई