अरे बापरे ! पत्नी सुंदर दिसू नये म्हणून चावलं नाक

By Admin | Updated: September 15, 2016 10:39 IST2016-09-15T10:39:33+5:302016-09-15T10:39:33+5:30

आपली पत्नी सुंदर दिसू नये म्हणून विकृत पतीने तिचं नाक चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Oh dear! Chavalna nose so that the wife should not look beautiful | अरे बापरे ! पत्नी सुंदर दिसू नये म्हणून चावलं नाक

अरे बापरे ! पत्नी सुंदर दिसू नये म्हणून चावलं नाक

>ऑनलाइन लोकमत
शाहजहापूर (उत्तरप्रदेश), दि. 15 - आपली पत्नी सुंदर दिसू नये म्हणून विकृत पतीने तिचं नाक चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजीव राठोड असं या आरोपी पतीचं नाव आहे. आपल्या पत्नीचं अफेअर असल्याचा संशय संजीवला होता. या संशयातूनच त्याने हे विकृत कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. संजीव आणि कमलेश यांचं सात वर्षापुर्वी लग्न झालं होतं. 
 
नरोथा हंसराम या गावातील ही घटना आहे. या दांपत्याला 6 वर्षाची मुलगीदेखील आहे. संजीव खूप रागिष्ट स्वभावाचा असल्याचं शेजा-यांनी सांगितलं आहे. बुधवारी सकाळी कलमेश फोनवर कोणाशी तरी बोलत होती, हे पाहून संजीवचा राग अनावर झाला. दोघांमध्ये मोठं भांडणदेखील झालं. त्याचवेळी त्याने कमलेशचं नाक चावलं अशी माहिती शेजा-याने दिली आहे. संजीव दारुच्या नशेत होता असंही शेजा-याने सांगितलं आहे. 
 
घटनेनंतर कमलेशच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. आरोपी पती संजीव फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: Oh dear! Chavalna nose so that the wife should not look beautiful