शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:02 IST

Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलेआंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केलेअंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले

अंबाला - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून सध्या शेतकरी आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनाही आज हरयाणामधील अंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले.आंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केले. माझे आंबाला येथे सात ते आठ कार्यक्रम आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विरोधच करायचा होता तर कुठेतरी दुसऱ्या जागी जाऊन मरायचे होते. मला काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देवाने सदबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना, असे कटारिया म्हणाले.

कटारिया अंबाला येथे आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करायला लावूनच आम्ही थांबणार आहोत, असे शेतकरी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनाही विरोध केला आहे.दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत हरियाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनीही आक्षेपार्ह विधान केले होते. काही परकीय शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. या परकीय शक्ती शेतकऱ्यांना पुढे करून अडथळे आणत आहेत, धोरणे ही रस्त्यावर नाही तर संसदेत लोकप्रतिनिधी निश्चित कऱतात. शेतकऱ्यांनी विरोध करण्याऐवजी या कायद्यांचा परिणाम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने थांबावे, परिणाम न पाहता विरोध करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी