Odisha: गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरला! अन् मग... आता मृत्युशी झुंजतोय तरुण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:15 IST2026-01-08T15:14:35+5:302026-01-08T15:15:31+5:30
Odisha Viral News: ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून अत्यंत भयानक प्रकार समोर आला.

Odisha: गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरला! अन् मग... आता मृत्युशी झुंजतोय तरुण!
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून अत्यंत भयानक प्रकार समोर आला. गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणाला सापाने दंश केल्याने त्याची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सध्या हा तरुण मृत्युशी झुंज देत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुबल साहू असे संबंधित तरुणाचे नाव आहे, जो व्यवसायाने गवंडी आहे. साहू हा मंगळवारी बोंट परिसरातील एका स्थानिक बाजारात गळ्यात साप गुंडाळून फिरत होता. मात्र, अचानक सापाने त्याला दंश केला आणि त्याची प्रकृती बिघडली. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, सुबल हा सापाला वारंवार डवचताना दिसत आहे. तसेच सापाच्या जिभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे.
तरुणाची प्रकृती चिंताजनक
सापाने चावा घेतल्यानंतरही काही वेळ सुबल सापाशी खेळतच राहिला. मात्र, सापाचे विष शरीरात भिनल्याने त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. त्याला तातडीने भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच सापाने चावा घेतल्यास कोणताही घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ रुग्णालयात जाणे आवश्यक आहे," असे आवाहन भद्रक येथील डॉक्टरांनी केले आहे.