शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

दिवसा शिक्षक, रात्री कुलीचं काम...पैशासाठी नव्हे, माणुसकीसाठी काम करणारा 'देवमाणूस'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:10 IST

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती मेहनत घेतात, याची काहीवेळा विद्यार्थ्यांना देखील कल्पना नसते.

शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती मेहनत घेतात, याची काहीवेळा विद्यार्थ्यांना देखील कल्पना नसते. शिक्षकांचे एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं त्यांना मिळालेल्या ज्ञानातून आयुष्यात यश प्राप्त करावं. ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय नागेशू पात्रो देखील याच उद्देशातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. ते एक सामान्य शिक्षक नाहीत, कारण ते विद्यार्थ्यांना तसेच त्याच्या सहकारी शिक्षकांना मदत करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. ही मेहनत केवळ मानसिकच नाही तर शारीरिक देखील आहे. 

नागेशू पात्रो हे व्यवसायाने एका खाजगी महाविद्यालयात गेस्ट टीचर आहेत. दिवसा ते कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. त्याचवेळी ते रात्री बेरहामपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करतात. कुली म्हणून काम करुन मिळणारे पैसे ते गरीब विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये मोफत शिकवण्यासाठी नेमलेल्या शिक्षकांचे पगार देण्यासाठी वापरतात.

दिवस सुरू होताच पात्रो एका खाजगी महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात. यानंतर ते गरीब विद्यार्थ्यांसाठी उघडलेल्या कोचिंग सेंटरमध्ये मोफत क्लास घेतात. रात्री तो बेरहामपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करतात. 

गरीब मुलांना शिकवण्यासाठी कोचिंग क्लास"कोविड महामारीच्या काळात घरी बसून राहण्याऐवजी गरीब मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर सुरू करावं लागलं", असं नागेशू पात्रो म्हणाले. ते स्वतः हिंदी आणि ओडिया विषय शिकवतात, तर उर्वरित विषयांसाठी त्यांनी इतर शिक्षकांची नेमणूक केली आहे. पात्रो त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये इतर चार शिक्षकांना नेमलं आहे, ज्यांना ते सुमारे १०,००० ते १२,००० रुपये मानधन देतात. पण एवढे पैसे देण्यासाठी ते रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करतात.

पगारातून चालवतात घरस्वत: लेक्चरर झाल्यानंतर कुली म्हणून काम करण्याची लाज वाटते का, असे जेव्हा पात्रो यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, "लोकांना जे वाटतं ते त्यांना विचार करू द्या, मला मुलांना शिक्षण देणं जास्त आवडतं आणि मला गरीब विद्यार्थ्यांना मदत करायची आहे." गेस्ट लेक्चरर म्हणून ते ८,००० रुपये कमावतात. एका खाजगी महाविद्यालयात लेक्चरर असून ते आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी वापरतात. 

स्वत:चंही शिक्षण पूर्ण करण्यात आलेल्या अडचणीपात्रो २००६ साली १०वीच्या परीक्षेला बसू शकले नाहीत, कारण मेंढ्या चरणाऱ्या त्यांच्या वडिलांना दोन दिवस भाकरीची व्यवस्था करणं देखील कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत शिक्षण हे त्यांच्यासाठी दूरचं स्वप्न होतं. तेव्हापासून पात्रो अधिकाधिक मुलांना शिक्षित करण्याच्या मोहिमेत व्यस्त आहे. वंचित पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांनी कुटुंबाच्या आर्थिक समस्यांमुळे अभ्यास सोडावा असं त्यांना वाटत नाही.

पात्रो २०११ पासून रेल्वे स्थानकावर कुली म्हणून नोंदणीकृत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी १२वीची परीक्षा बाहेरुन अभ्यासक्रमाद्वारे देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण बर्हमपूर विद्यापीठातून पूर्ण केलं. रात्री कुली म्हणून काम करून कमावलेल्या स्वतःच्या पैशातून त्यांनी सर्व उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. "सध्या लोक ट्रॉली बॅग आणि एस्केलेटर वापरत आहेत, त्यामुळे कुली म्हणून मिळणारी कमाई कमी झाली आहे. रेल्वे स्थानकावर काबाडकष्ट करणाऱ्या कुली समाजासाठी काहीतरी करावं", असंही आवाहन पात्रो यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केलं आहे.

टॅग्स :Educationशिक्षण