...म्हणून ७० वर्षीय मुलीने आपल्या वयोवृद्ध आईला बँकेपर्यंत खाटेवर बसवून नेले ओढत, बँकेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:30 PM2020-06-14T13:30:54+5:302020-06-14T13:55:52+5:30

ओडिसामधील नुआपाडा जिल्ह्यातील बरागान या गावी ही घटना घडली. याठिकाणी ७० वर्षीय मुलीला आपल्या १२० वर्षांच्या आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत ओढत नेण्याची वेळ आली.

Odisha: Elderly daughter carries 120-year-old mother on cot to bank for pension | ...म्हणून ७० वर्षीय मुलीने आपल्या वयोवृद्ध आईला बँकेपर्यंत खाटेवर बसवून नेले ओढत, बँकेवर टीका

...म्हणून ७० वर्षीय मुलीने आपल्या वयोवृद्ध आईला बँकेपर्यंत खाटेवर बसवून नेले ओढत, बँकेवर टीका

Next
ठळक मुद्देया घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सकडून बँकेवर टीका करण्यात येत आहे.

भुवनेश्वर : ओडिसामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेत खातेधारकाची सत्यता पडताळणीसाठी एका ७० वर्षीय मुलीने आपल्या १२० वर्षांच्या आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत ओढत घेऊन गेल्याची घटना घडली.

ओडिसामधील नुआपाडा जिल्ह्यातील बरागान या गावी ही घटना घडली. याठिकाणी ७० वर्षीय मुलीला आपल्या १२० वर्षांच्या आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत ओढत नेण्याची वेळ आली. येथील उत्कल बँकेतून आईची पेन्शन घेण्यासाठी या मुलीला असे करावे लागले. लभे बघेल असे या वयोवृद्ध  महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लभे बघेल यांनी आपली मुलगी गुंजा देई यांना बँकेतून पेन्शनचे 1500 रुपये घेण्यासाठी पाठविले होते. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला आणि खातेधारकाची सत्यता पडताळणीसाठी आईला बँकेत घेऊन या, असे गुंजा देई यांना सांगितले. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यामुळे गुंजा देई यांनी आपल्या वयोवृद्ध आईला खाटेवर बसवून बँकेपर्यंत आणले. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी लभे बघेल यांची प्रकृती लक्षात घेत, त्यांना पेन्शनचे पैसे दिले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सकडून बँकेवर टीका करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणाची दखल महानगरपालिका आयुक्त प्रेमचंद चौधरी यांनी घेतली आहे. त्यांनी सर्व बँकांच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून ज्येष्ठ नागरिकांच्या घरापर्यंत बँक सेवा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

आणखी बातम्या...

"वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले...", संजय राऊतांसह राजकीय नेत्यांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा!

'आत्मनिर्भर पॅकेज' परिपूर्ण नाही; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडूनच प्रश्नचिन्ह

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, निवृत्त महिला पोलीस निरीक्षकाकडून 1.10 कोटी रुपयांचा निधी

Web Title: Odisha: Elderly daughter carries 120-year-old mother on cot to bank for pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.