शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ओबीसी उप-वर्गांना मिळणार २७ टक्क्यांतून राखीव जागा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 4:30 AM

इतर मागासवर्गात (ओबीसी) उप-वर्गवारीचा (सब-कॅटिगोरायझेशन) अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग ओबीसींसाठीच्या २७ टक्क्यांतून ८ ते १० टक्के राखीव जागा या उपवर्गासाठी द्या, अशी शिफारस बहुधा करील.

नवी दिल्ली : इतर मागासवर्गात (ओबीसी) उप-वर्गवारीचा (सब-कॅटिगोरायझेशन) अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग ओबीसींसाठीच्या २७ टक्क्यांतून ८ ते १० टक्के राखीव जागा या उपवर्गासाठी द्या, अशी शिफारस बहुधा  करील.केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीत २,६३३ जाती असून, त्यातील सुमारे १,९०० जातींसाठी हा ८ ते १० टक्के राखीव जागांचा कोटा असू शकेल.सध्या या १,९०० पेक्षा जास्त जातींपैकी निम्म्या जातींना नोकऱ्या आणि शिक्षणात तीन टक्क्यांपेक्षा कमी राखीव जागा आहेत व राहिलेल्या जातींना गेल्या पाच वर्षांत राखीव जागांचा शून्य लाभ मिळाला आहे.केंद्र सरकारने न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी यांचा आयोग २ आॅक्टोबर, २०१७ रोजी स्थापन केला होता. या आयोगाला अनेक वेळा मुदतवाढ दिली गेल्यानंतर आता त्याचा अहवाल त्याची मुदत ३१ मे, २०१९ रोजी संपणार असताना जवळपास पूर्ण झाला आहे.पाच वर्षांतील केंद्र सरकारच्या नोक-या आणि शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी जागांच्या (कोटा) अंमलबजावणीच्या माहितीतून फारच थोड्या जातींना याचा लाभ मिळाला आहे, हे समोर आले आहे.ओबीसी समाजातील वेगवेगळ्या जातींनाही राखीव जागांचा लाभ (जो आतापर्यंत ठराविक जातींनाच मिळतो आहे.) मिळावा व त्याचे प्रमाण किती असेल, असा प्रयत्न सरकारने या आयोगाद्वारे प्रथमच केला आहे व तो असमतोल दूर करण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत.काय असू शकतात निकष?राखीव जागांच्या टक्केवारीत पुन्हा ठराविक जागा (कोटा) सुचवताना आयोगाने महत्त्वाची शिफारस केली आहे. ती म्हणजे वर्गवारी ही सामाजिकदृष्ट्या किती मागास आहात यावर नाही तर किती लाभ घेतले यावर आधारित असेल. त्याचे निकष सामाजिक दर्जा, परंपरागत व्यवसाय, धर्म आदी आहेत.आयोगाच्या अंतिम विचारविनिमयाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, सामाजिक निकषांचा वापर करून ओबीसींना आधीच निश्चित करण्यात आले आहे.आम्ही मागासवर्गांत सामाजिक उतरंड निर्माण करण्याच्या प्रयत्नांत नाही. १,९०० गटांपैकी अनेक जण राखीव जागांचा लाभ घेऊ शकले नाहीत. कारण ते नगण्य संख्येत आहेत. त्यामुळे ते शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये प्रवेश मिळवू शकले नाहीत. 

टॅग्स :reservationआरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण