नूतन पदाधिकारी कारखान्याचा आलेख उंचावतील : पाटील

By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

वालचंदनगर : नीरा-भीमा कारखान्याचे नूतन पदाधिकारी कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावतील, असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्र्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

Nutan officer will raise the plot of factory: Patil | नूतन पदाधिकारी कारखान्याचा आलेख उंचावतील : पाटील

नूतन पदाधिकारी कारखान्याचा आलेख उंचावतील : पाटील

लचंदनगर : नीरा-भीमा कारखान्याचे नूतन पदाधिकारी कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावतील, असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्र्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
नीरा-भीमाचे नूतन अध्यक्ष लालासाहेब पवार यांचा शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथे नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी लालासाहेब पवार व त्यांची पत्नी दुर्गाबाई यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी पवार म्हणाले, की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी कारखाना संस्थापकांनी दिली. या संधीचा उपयोग सर्वांच्या सहकार्याने कारखान्याच्या प्रगतीसाठी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, पद्माताई भोसले, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, माजी उपाध्यक्ष विलास वाघमोडे, कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, संचालक नामदेव किरकत, माजी सभापती प्रदीप पाटील, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली बनकर, भरत शहा, खंडकरी शेतकरी नेते बी. डी. पाटील, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती नारायण वीर, संचालक दिनकर नलवडे, संचालक राजेंद्र गायकवाड, शिवाजी शिंगाडे, भागवत भुजबळ, तालुका कॉँग्रेसचे सरचिटणिस फिरोज पठाण, हनुमंत कदम, बापूराव माने, अजित पवार, राजेंद्र पवार, नवनाथ कदम, अंकुश कदम, उत्तम काटे, अशोक भुजबळ उपस्थित होते.

Web Title: Nutan officer will raise the plot of factory: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.